लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे: पंतप्रधान संसदेचे अधिवेशन घेत नाहीत, त्याच कारणावरून विधानसभेचेही अधिवेशन होत नाही, हे जगजाहीर आहे, सर्व राज्यात हीच स्थिती आहे, असे जलसंपदामंत्री जयंत पाटील म्हणाले. चंद्रकांत पाटलांंना स्वप्न पडण्याची सवयच आहे, असे सांगत जयंत पाटील यांनी त्यावर काय बोलणार म्हणत दुर्लक्ष केले.
साखर संकुलमध्ये झालेल्या बैठकीनंतर पाटील यांनी पत्रकारांबरोबर बोलताना पाटील म्हणाले, अधिवेशनावरून भारतीय जनता पार्टीचे राज्यातील नेते करत असलेली टीका योग्य नाही. पंतप्रधानांमध्ये अधिवेशन घेण्याची हिंमत नाही का अशीही विचारणा होऊ शकते. कोरोनामुळे असाधारण स्थिती असताना अशी टीका योग्य नाही.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही संभाजीराजे यांची अगदी सुरूवातीपासूनची भूमिका आहे. यासाठी ते सर्व राजकीय पक्षप्रमुखांना भेटत असतील तर ते स्वाभाविक आहे, त्यात काही गैर नाही असे पाटील म्हणाले.