चंद्रकांत पाटलांसारख्या मोठ्या व्यक्तीच्या 'त्या' वक्तव्याबद्दल बोलणं योग्य नाही, अजित पवारांची उपहासात्मक टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2022 01:37 PM2022-02-13T13:37:19+5:302022-02-13T13:37:55+5:30

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी १० माचर्नंतर राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार जाणार असल्याचे विधान केले होते

Chandrakant Patil is a very big person It is not appropriate to talk about him said Ajit Pawar | चंद्रकांत पाटलांसारख्या मोठ्या व्यक्तीच्या 'त्या' वक्तव्याबद्दल बोलणं योग्य नाही, अजित पवारांची उपहासात्मक टीका

चंद्रकांत पाटलांसारख्या मोठ्या व्यक्तीच्या 'त्या' वक्तव्याबद्दल बोलणं योग्य नाही, अजित पवारांची उपहासात्मक टीका

Next

बारामती: चंद्रकांत पाटील ही फार मोठी व्यक्ती आहे. त्यांनी केलेल्या वत्कव्याबाबत माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याने बोलणे योग्य होणार नाही, अशा उपहासात्मक शैलीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली आहे. 

बारामती येथे पंचायत समितीच्या नविन इमारतीची पहाणी करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार रविवारी (दि. १३) आले होते यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. १० मार्च रोजी देशातील पाच राज्यांच्या निवडणुक निकाल येणार आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी १० माचर्नंतर राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार जाणार असल्याचे विधान केले होते. या मुद्द्यामवर माध्यमांनी उपमुख्यमंत्री पवार यांनी छेडले असता. त्यांनी यावर बोलण्यास नकार दिला. 

शिवसेना आमदारांच्या तक्रारीची दखल घेऊ...

राज्यातील शिवसेनेचे आमदार सातत्याने आपल्याला निधी कमी दिला जाते अशी तक्रार करतात यावर बोलताना अजित पवार म्हणाले, प्रत्येक पक्षाच्या आमदाराला आपल्याला निधी मिळाला पाहीजे असे वाटत असते. यामध्ये कोणाचेच समाधान होत नाही. मागील दोन वर्षांपासून कोरोनाचे सावट आहे. त्यामुळे उत्पन्नावर परिणाम झाला आहे. मिळणाऱ्या उत्पन्नावर हा रथ चालवावा लागतो. त्यामध्ये विकासकामांमध्ये कोणताही खंड पडता कामा नये असा आमचा प्रयत्न आहे. शिवसेना आमदारांचे असे मत असेल तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, यांच्यासह महाविकास आघाडीमधील प्रमुख नेत्यांशी चर्चा करून त्यांच्या अडचणी सोडवण्यात येतील, असे पवार म्हणाले. 

भाजपच्या १२ आमदारांचे निलंबन मागे...

भाजपच्या बारा आमदारांच्या निलंबन रद्दच्या मुद्द्याशी राज्यसरकारचा सबंध नाही. त्याचा विधीमंडळाशी सबंध येतो. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे सर्वांनाच पालन करावे लागते. सभापती रामराजे नाईक-निंबाळकर व उपसभापती नरहरी झिरवळ यांनी राष्ट्रपतींची भेट घेतली होती. यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे या बारा आमदारांचे निलंबन मागे घेण्यात आले आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. 

Web Title: Chandrakant Patil is a very big person It is not appropriate to talk about him said Ajit Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.