पुण्यातील व्यापाऱ्यांच्या आंदोलनाला चंद्रकांत पाटलांचा पाठिंबा; म्हणाले मी स्वतः करणार नेतृत्व...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2021 02:42 PM2021-08-02T14:42:34+5:302021-08-02T14:43:52+5:30

पुण्यातील व्यापाऱ्यांकडून विविध ठिकाणी येत्या ३ ऑगस्टला दुपारी घंटानाद आंदोलन करण्यात येणार आहे.

Chandrakant Patil's support to the traders' movement in Pune; Said I will lead myself ... | पुण्यातील व्यापाऱ्यांच्या आंदोलनाला चंद्रकांत पाटलांचा पाठिंबा; म्हणाले मी स्वतः करणार नेतृत्व...

पुण्यातील व्यापाऱ्यांच्या आंदोलनाला चंद्रकांत पाटलांचा पाठिंबा; म्हणाले मी स्वतः करणार नेतृत्व...

Next
ठळक मुद्देपुण्यातील कडक निर्बंधामुळे व्यापारी वर्गाच मोठ्या प्रमाणवर नुकसान

पुणे : पुणे शहरातील कोरोना परिस्थिती गेल्या चार महिन्यांपासून नियंत्रणात येत आहे. रूग्णसंख्या सातत्याने कमी झालेली असतानाही सरकारने व्यवसायांच्या वेळांमध्ये कोणताही बदल केला नाही़. त्यामुळे झोपचे सोंग घेतलेल्या सरकारला जागे करण्यासाठी व व्यापारी वर्गाला योग्य न्याय मिळावा, याकरिता पुण्यातील व्यापाऱ्यांकडून विविध ठिकाणी येत्या ३ ऑगस्टला दुपारी घंटानाद आंदोलन करण्यात येणार आहे. 

दरम्यान यानंतरही राज्य सरकार जागे झाले नाही व दुकानांच्या वेळा वाढवल्या नाहीत. तर बुधवार ४ ऑगस्टपासून पुणे शहरातील सर्व दुकाने ७ वाजेपर्यंत उघडी ठेवण्यात येतील. यावेळी आम्हाला अटक करून आमच्यावर कारवाई झाली. तरी आम्ही त्यास सामोरे जाण्यास तयार असल्याची भूमिका शहरातील व्यापाऱ्यांनी घेतली आहे. या भूमिकेला चंद्रकांत पाटलांच्या वतीने पाठिंबा दर्शवण्यात आला आहे. पुण्यात कोकणातील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी साहित्य पाठवणे कार्यक्रमासाठी पाटील आले होते. यावेळी त्यांच्या पक्ष कार्यालयातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 

पाटील म्हणाले, ''भाजप पक्ष हा आंदोलनजीवी नाही. परंतु सध्याच्या पुण्यातील कडक निर्बंधामुळे व्यापारी वर्गाच मोठ्या प्रमाणवर नुकसान होत आहे. पुण्यातल्या व्यापाऱ्यांकडून सातत्याने वेळ वाढवण्याची मागणी होतानाचे चित्र आहे. त्याच पार्श्वभूमीवर व्यापाऱ्यांनी वेळ वाढवण्याबाबत दोन दिवसाची मुदत पण दिली आहे. त्याची राज्य सरकारने दाखल घेतली नाही. तर व्यापारी बुधवारी घंटानाद आंदोलन करणार आहेत. माझा आणि पक्षाचा या आंदोलनाला पाठिंबा असून मी स्वतः त्याचे नेतृत्व करणार असल्याचे पाटील यांनी सांगितले आहे.'' 

दुसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेत ५ एप्रिल, २०२१ पासून राज्य सरकारने पुणे शहरात जीवनावश्यक वस्तूंखेरीज बाजारपेठेतील इतर सर्व व्यवसायांवर वेळेची बंधने आणली. मात्र आता चार महिने उलटून गेले तरीही यामध्ये अपेक्षेप्रमाणे शिथिलता आलेली नाही़. एकीकडे बाजारपेठा सोडून सर्व गोष्टी चालू आहेत, राजकीय सभा समारंभ, आमदारांच्या मुलांचे शाही विवाह होतात. परंतु, दुसरीकडे व्यापारी वर्गालाच लॉकडाऊनचे नियम लादले जात आहेत. यामुळे व्यापारी वर्गात मोठा असंतोष असून राज्याचे उपमुख्यमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी, वेळेत वाढ करण्याबाबत पंधरा दिवसांपूर्वी व्यापाऱ्यांना दिलेले आश्वासन पाळावे अशी मागणी व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष फत्तेचंद रांका यांनी पत्रकार परिषदेत केली होती.  

Web Title: Chandrakant Patil's support to the traders' movement in Pune; Said I will lead myself ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.