-डॉ. जे. के. सोळंकी प्राचीन इतिहास पाहिल्यास आपल्या असे लक्षात येते, की मानवाच्या परिस्थितीमध्ये अनेक प्रकारच्या सुधारणा ह्या केवळ विज्ञानामुळे झाल्याचे दिसून येते. आणि निश्चितच विज्ञानामुळे मानवी समाजाची प्रगती झालेली आहे. विज्ञान व तंत्रज्ञान हे मानवाच्या कल्याणासाठीच असावे, असे सर्वांना माहीत असूनही काही अविचारी लोक याचा दुरुपयोग करीत आहे. काही स्वार्थी व अविचारी लोकांच्या फायद्यासाठी समाजात अंधश्रद्धा आजही पसरविल्या जात आहेत व विज्ञान माहीत असूनही लोक आमिषाला बळी पडतात. यासाठी वरचेवर विज्ञान प्रसार केला पाहिजे व लोकांना विज्ञानवादी बनविले पाहिजे. वैज्ञानिकदृष्ट्या भारताने अनेक क्षेत्रांत प्रगती केली आहे व दिवसेंदिवस त्यामध्ये भर पडत आहे. त्यामुळे पाश्चात्य जगाचा भारताकडे पाहण्याचा दृष्टिकोन नक्कीच बदलला आहे. परंतु अजून खूप काही करायचे आहे. त्यासाठी भारतात विज्ञान व तंत्रज्ञानाची प्रगती खूप वेगाने चालू ठेवली पाहिजे. भारत ही जगातील ज्ञान विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रात नक्कीच महासत्ता होईल; परंतु त्यासाठी देशातील प्रत्येकाने मनापासून प्रामाणिक प्रयत्न केले पाहिजेत.मुळात मूलभूत विज्ञान हे विकासात्मक संशोधनाचा पाया असतो; परंतु मूलभूत विज्ञान क्षेत्रामध्ये अनेक विद्यार्थी येण्यास तयार होत नाहीत, अर्थात याला काही प्रमाणात शैक्षणिक धोरणे व नोकरींची उपलब्धता हेही जबाबदार आहेत. मूलभूत विज्ञानाकडे करियर म्हणून पाहिले पाहिजे जरी यामध्ये पैसा कमी मिळत असला तरीही...! शैक्षणिक धोरणे बदलाने, नोकरींची भरपूर प्रमाणात उपलब्धता करणे व चांगल्या प्रमाणात पैसा उपलब्ध करून देणे हे प्रयत्न तर केलेच पाहिजेत. याचबरोबर खासगी कंपन्यांना व उद्योगांना यामध्ये समाविष्ट केले पाहिजे. (विज्ञान दिनामागचं गुपित!)(अवघा देश ‘विज्ञानाभिमुख’ व्हावा)प्रसारमाध्यमामध्ये विज्ञान विषयाबद्दल लिहिण्यासाठी पत्रकारांना प्रशिक्षण देणे तसेच त्यांना विज्ञानावर आधारित लेखासाठी चांगले मानधन देणे गरजेचे आहे. प्रसारमाध्यमे व विज्ञान संस्था यांच्यात वारंवार संपर्क व संवाद झाला पाहिजे. वरील बाबींचा पाठपुरावा केल्यास अभ्यासू पत्रकार प्रसारमाध्यमाच्या सदुपयोगातून विज्ञान प्रसार नक्कीच करतील, असा विश्वास आहे!
शैक्षणिक धोरणातच बदल व्हावा
By admin | Published: February 28, 2017 1:32 AM