पुणे : गणेश विसर्जन मिरवणुकीमुळे सोमवारी पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या बसमार्गात बदल करण्यात आले आहेत. वाहतूक पोलिसांनी मध्य भागातील काही मार्ग वाहतुकीसाठी बंद केले आहेत. त्यामुळे या मार्गांवरून बससेवा बंद राहून असून, पर्यायी मार्गाने बस सोडल्या जाणार आहेत.शहराच्या मध्य भागातील सर्व प्रमुख रस्त्यांवरून मिरवणूक निघते. मिरवणूककाळात लक्ष्मी रस्ता, टिळक रस्ता, बाजीराव रस्ता, केळकर रस्ता, कुमठेकर रस्ता, शिवाजी रस्ता, जंगली महाराज रस्ता, फर्ग्युसन रस्ता, लालबहादूर शास्त्री रस्ता यांसह अन्य काही प्रमुख मार्गांवर मिरवणुकीतील रथ तसेच गणेशभक्तांची मोठी गर्दी होते. त्यामुळे या मार्गावरील सर्व बस इतर मार्गाने वळविल्या जाणार आहेत.सायंकाळनंतर स्वारगेट स्थानकातून बससेवा बंद केली जाईल. त्याऐवजी लक्ष्मीनारायण चौक, वेगा सेंटर, सारसबागेजवळून बस सोडल्या जाणार आहेत. कर्वे रस्त्यावरीलबस खंडूजीबाबा चौकापर्यंत असतील. सायंकाळनंतर या बस एसएनडीटी विद्यापीठापासून सोडल्याजातील. सायंकाळानंतर बसेसच्या संख्येतही निम्म्यापर्यंत कपात केली जाणार असल्याची माहिती अधिकाºयांनी दिली.
मिरवणुकीमुळे बसमार्गात बदल, मध्यवस्तीतील काही मार्ग बंद : पर्यायी मार्गावरुन सेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 05, 2017 1:52 AM