पुणे : येरवडा वाहतूक विभागांतर्गत कल्याणी व्हेज हॉटेल ते लेक्सीकन शाळा आणि महावितरण कार्यालय ते सायबेज कंपनी कॉर्नर, मारिगोल्ड सोसायटी गेट ते कुमार कृती सोसायटीपर्यंत चारचाकी व दुचाकींकरिता संपूर्ण समांतर पार्किंग करण्यात येत आहे.
याबाबत नागरिकांनी आपल्या सूचना असल्यास पोलीस उपआयुक्त, वाहतूक नियंत्रण शाखा, बंगला क्रमांक ६, येरवडा टपाल कचेरीजवळ, पुणे-४११००६ येथे २० सप्टेंबरपर्यंत लेखी स्वरूपात कळवावे.
नागरिकांच्या सूचना व हरकती विचार करून अंतिम आदेश काढण्यात येणार आहेत. अत्यावश्यक सेवेतील (उदा. फायर ब्रिगेड, पोलीस वाहने, रुग्णवाहिका, आदी) वाहनांना हे आदेश लागू नसतील असे वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे यांनी कळविले आहे.