शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त 'पीएमपी' बसमार्गांमध्ये बदल

By भाग्यश्री गिलडा | Published: April 12, 2024 8:23 PM

पुणे स्टेशन जवळील बोल्हाई चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्णहार अर्पण करण्यासाठी भाविकांची गर्दी होते

पुणे : भारताच्या संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पीएमपीच्या काही बसमार्गांमध्ये बदल करण्यात आलेले आहेत. पुणे शहर तसेच उपनगरांत मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. तसेच पुणे स्टेशन जवळील बोल्हाई चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्णहार अर्पण करण्यासाठी भाविकांची गर्दी होत असल्याने रविवारी (दि. १४) डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्थानक, ससून रोड व मोलेदिना बस स्थानक येथून सुटणाऱ्या बसेस पेटीट बस स्थानक (पुणे स्टेशन आगार) येथून सुटतील व परतीच्या वेळी बंडगार्डन कडून येताना वाडीया कॉलेज, अलंकार चौक व पेटीट बस स्थानक (पुणे स्टेशन आगार) असे संचलनात राहतील. सदरचा बदल हा पोलीस खात्याच्या आदेशानुसार करण्यात आलेला असलायची माहिती महामंडळाने दिली आहे.

बदल खालीलप्रमाणे 

- २९, १४८, १४८अ, २०१ या मार्गाच्या बसेस जाता येता साधु वासवानी चौक, अलंकार चौक व पुढे नेहमीप्रमाणे संचलनात राहतील.- ३, ५, ६, ३९, ५७, १४०, १४०अ, १४१ या मार्गाच्या बसेस पुणे स्टेशनकडे जातेवेळेस नरपतगीर चौकातून अथवा के. ई. एम. हॉस्पिटल जवळून उजवीकडे वळून एम्प्लॉयमेंट ऑफिस, लालदेऊळ व पुढे पुणे स्टेशन डेपो स्थानकामधून संचलनात राहतील व परतीच्या वेळी त्याच मार्गाने संचलनात राहतील. मात्र जास्त गर्दी होऊन रस्ता बंद झाल्यास सदर मार्गाची वाहतुक नरपतगीर चौकातून करणेत येईल.- २४, २४अ, ३१, २३५, २३६ या मार्गाच्या बसेस पुणे स्टेशनकडे जातेवेळेस नरपतगीर चौक अथवा के.ई.एम. हॉस्पिटल चौकातून रास्तापेठ पॉवर हाऊस, एम्प्लॉयमेंट ऑफिस जवळून लाल देऊळ, पोलीस मुख्यालय व पुढे नेहमीच्या मार्गाने जातील. मात्र परतीच्या वेळी तूर्त याच मार्गाने संचलनात राहतील. - ८, ८१, ९४, १०८, १४३, १४४, १४४अ, १४४क, २८३ या मार्गाच्या बसेस पुणे स्टेशनकडे जाताना नरपतगीर चौक अथवा के.ई.एम.हॉस्पिटल चौकातून एम्प्लॉयमेंट ऑफिस मार्गे लाल देऊळ, पोलीस मुख्यालय, सरळ पुढे पुणे स्टेशन डेपोतून वळवून जी.पी.ओ. पासून सोडण्यात येतील व पुढे नेहमीच्या मार्गाने संचलनात राहतील. (रास्तापेठ पॉवर हाऊस मार्गे)- १४२, १४५, १४६ या मार्गाच्या बसेस पुणे स्टेशनकडे जाता-येता पेटीट इस्टेट स्थानकावरून सुटून जी.पी.ओ., लाल देऊळ, जिल्हा परिषद चौक, गाडीतळ मार्गे नेहमीच्या मार्गाने संचलनात राहतील.- ८६, ९८, १०२, १३१, १३२, १३३, १३३अ, १३५, १३७, १४७, १५८, १५९, १५९ब, १६२, १६४, १६५, १६९, २३४, २३७ या मार्गाच्या बसेस जुना बाजार, गाडीतळ चौकानंतर गाडीतळ, लाल देऊळ, कमिशनर ऑफिस व पुढे नेहमीच्या मार्गाने  संचलनात राहतील.

टॅग्स :PuneपुणेPMPMLपीएमपीएमएलDr. Babasaheb Ambedkarडॉ. बाबासाहेब आंबेडकरSocialसामाजिकTrafficवाहतूक कोंडी