घोडेगाव येथे श्री दत्त जयंतीच्या दिवशी सर्जा पेट्रोलियम या श्वेता यशराज काळे यांच्या नुतन पेटोल पंपाच्या उद्घाटन प्रसंगी वळसे पाटील बोलत होते. यावेळी विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशिल शेरकर, शारदा प्रबोधिनीचे ह.भ.प.पांडुरंग महाराज येवले, आंबेगाव तालुका विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष अजितशेठ काळे, जुन्नर तालुक्याचे माजी सभापती बाजिरावशेठ ढोले, सखाराम पाटील काळे, वसंत काळे उपस्थित होते.
वळसे पाटील म्हणाले, आंबेगाव तालुक्यात ४हजार ५०० बाधित झाले. या रूग्णांसाठी एक हजार बेडची व्यवस्था अवसरी कॉलेज मध्ये केली तसेच मंचर उपजिल्हा रूग्णालयात अद्यावत सोयी निर्माण केल्या. त्यामुळे आज आपण तालुक्यातच लोकांवर उपचार करू शकलो.
मात्र कोरोना अजून संपलेला नसून कमीत कमी सहा महिने ते एक वर्ष सर्वांना काळजी घ्यावी लागणार आहे. यासाठी तोंडाला मास्क लावा, सतत हात स्वच्छ करा, गर्दी करु नका व दोन व्यक्ति मधील अंतर ठेवा. ग्रामपंचायत निवडणूकांमध्ये सरकारने घालून दिलेल्या नियमांचे पालन करा असे वळसे पाटील यांनी सांगितले.
घोडेगाव येथे आयोजीत कार्यक्रमात बोलताना दिलीप वळसे पाटील
३० घोडेगाव वळसे-पाटील