पुणे : शहरातील कोरेगाव पार्क आणि बंडगार्डन वाहतूक विभागाच्या हददीत जहांगीर चौक ते आर.टी.ओ दरम्यान मेट्रोचे काम सुरू आहे. त्यामुळे बुधवारपासून (दि.14) पुढील आदेश येईपर्यंत या भागात प्रायोगिक तत्वावर वाहतुकीमध्ये बदल करण्यात आला आहे.
जहांगीर चौक ते आरटीओ चौक हा रस्ता वाहतुकीसाठी सकाळी 6 ते रात्री 11 पर्यंतच खुला राहणार आहे. त्यानंतर मेट्रोच्या कामासाठी रात्री 11 ते सकाळी 6 पर्यंत हा रस्ता बंद राहणार असल्याची माहिती वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे यांनी कळविली आहे.
नागरिकांनी बंद काळात पर्यायी मार्गाचा करावा अवलंब
मंगलदास चौकातून येणाऱ्या वाहनचालकांनी जहांगीर चौकातून डावीकडे वळून अलंकार चौक, पुणे स्टेशन, मालधक्का चौक, शाहीर अमर शेख चौक मार्गे इच्छित स्थळी जावे. तसेच आवश्यकतेनुसार डायव्हरशन केल्यास डावीकडे वळून आय.बी चौक,अलंकार चौक,पुणे स्टेशन, मालधक्का चौक, शाहीर अमर शेख चौक मार्गे इच्छित स्थळी जावे अशी सूचना नागरिकांना करण्यात आली आहे.