पुणे: पुण्यातील वारजे परिसरात असलेल्या RMD सिंहगड स्प्रिंग डेल स्कूलमध्ये स्कूल बसचालकांचे पगार दिला नसल्याने चालकांनी शाळेच्या पाहिल्या दिवशीच शाळेबाहेर ठिय्या मांडला आहे. ३७ महिन्याचे पगार थकवल्याचा आरोप बस चालकांनी केला आहे.
आज या शाळेचा पहिला दिवस होता. सगळे पालक बसची वाट बघत थांबले मात्र बस न आल्याने पालकांनी मुलांना शाळेत सोडल. शाळेत आल्यावर सगळ्या स्कूल चालकांनी हा प्रकार पालकांना सांगितला. शाळा पगार देण्यास टाळाटाळ करत असल्याचा स्कूल बस चालकाचा आरोप आहे. शाळेच्या पहिल्याच दिवशी शाळेत गोंधळ झाल्याचे दिसून आले आहे. या प्रकरणी शाळेच्या मुख्याधिका आशा ढोरे यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता आधी मॅडम बाहेर गेल्याच कर्मचाऱ्याने खोटं सांगितले. मात्र आत जाऊन बघितल असल्यास मुख्याध्यापिका मॅडम आतच होत्या. याप्रकरणी शाळेला विचारले असता त्यांनी आम्ही काहीही बोलत नसल्याचं सांगितलं आहे. जेव्हा काही असेल तर आम्ही आमची बाजू मांडू, अस शाळेने सांगितले आहे.