कोपर्डी घटने प्रकरणी सरकारनी कोर्टाकडे स्पेशल बेंचच्या माध्यमातून सहा महिन्यात निकाल द्यावा अशी मागणी करावी अशी भूमिका छत्रपती संभाजी राजेंनी घेतली आहे. पुण्यात आज छत्रपती संभाजी राजे यांनी बोलताना ही मागणी केली आहे. मराठा आरक्षण प्रश्नावर आता छत्रपती संभाजीराजेंनी आता भेटीगाठी घ्यायला सुरुवात केली आहे. आज ते कोपर्डी का जाऊन पीडित कुटुंबीयांची तसेच ग्रामस्थांची भेट घेणार आहेत. त्यानंतर औरंगाबाद ला जाऊन काकासाहेब शिंदे स्मारकाला भेट देणार आहेत.
ही वादळा पूर्वीची शांतता आहे असं म्हणत आपण आंदोलनाचा भूमिकेवर ठाम असल्याचे म्हणले आहे. कोपर्डी का जाण्यापूर्वी छत्रपती संभाजीराजे पुण्यात बोलताना म्हणाले ,"कोपर्डी घटनेचा दोषींवर निकाल अजूनही अमलात आलेला नाही.चार वर्ष का लागली ? राज्य सरकार ने काय करावे या दृष्टीने माझा कोपर्डी दौरा आहे. २०१६ मध्ये घटना घडली. २०१७ मध्ये निकाल लागला.प्रकरण हायकोर्टात गेलं. दोषींना दोन वर्ष संधीचा कालावधी देखील संपला. पण पुढची कारवाई झाली नाही.राज्य सरकारला माझी विनंती आहे की त्यांनी स्पेशल बेंच चा माध्यमातून सहा महिन्यात निकाल द्यावा अशी मागणी उच्च न्यायालयाकडे करावी."
दरम्यान आंदोलनावर चंद्रकांत पाटिल यांनी केलेल्या वक्तव्यावरून संभाजीराजे म्हणाले ,"चंद्रकांत दादांवर मला काही बोलायचं नाही. ते लाख म्हणत असतील पण मी मोर्चा म्हणलेलो नाही. माझी भूमिका स्पष्ट केली आहे. आम्ही मुक आंदोलन करू.आता लोकप्रतिनिधीनी बोलावं ही आमची भूमिका आहे."
नक्षलवाद्यांनी काढलेल्या पत्राबाबत संभाजीराजेंनी आपण यात पडणार नाही असं म्हणतानाच ज्याचं त्यांचं बोलण्याचे स्वातंत्र्य आहे असे म्हणले आहे.