कृषी संजवीनी मोहिमेअंतर्गत कृषि विभागाच्या वतीने वांद्रे ता. खेड येथे कृषि संजीवनी मोहीम अंतर्गत सुधारित भातलागवड तंत्रज्ञान चारसूत्री भातलागवडचा कार्यक्रम घेण्यात आला. कृषि विभागाच्या वतीने २१ जून ते १ ,जूलै कृषि संजिवनी मोहिम राबविण्यात येत असुन प्रत्येक कार्यालयीन कामाचे दिवशी वेगवेगळ्या महत्त्वाचे मोहिमेवर भर देण्यात येत आहे. यामध्ये बी बी एफ पेरणी,बीज प्रक्रिया ,खतांचा संतुलीत वापर , सुधारित भात लागवड तंञज्ञान,विकेल ते पिकेल , फळबाग लागवड योजना , अधिक उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांचा सहभाग , किड व रोग नियंञण उपाय योजना व कृषि दिन असे वेगवेगळ्या विषयावर मार्गदर्शन करण्यात येत आहे. या कार्यक्रमांतर्गत वांद्रे येथे सुधारित भातलागवड तंत्रज्ञानविषयी चारसूत्री भातलागवडीचा कार्यक्रम घेण्यात आला. पारंपारिक पध्दतीने भातपिकाला दिलेली रासायनिक खते एकतर पाण्यामध्ये वाहून जातात किंवा खोल जमिनीत जातात. त्यामुळे खतांचा कार्यक्षम वापर होण्यासाठी युरिया ब्रिकेटचा वापर फायदेशीर असल्याचे सांगितले. युरिया ब्रिकेट खताची उपलब्धता पाईट, पापळवाडी येथील कृषिधन कृषि विकास गटामार्फत करण्यात आल्याचे सांगून शेतकऱ्यांनी युरिया ब्रिकेट खतांचा जास्त वापर करावा, असे सांगितले.
या वेळी मंडल कृषि अधिकारी विजय पडवळ, कृषि पर्यवेक्षक प्रवीण शिंदे, कृषि सहायक जालिंदर मांजरे उपस्थित होते, तर गणेश भालेराव, राणू पिचड, कैलास सावंत, सोमनाथ पिचड, सुभाष पिचड, हरिदास सावंत, अभिजित सावंत हे शेतकरी उपस्थित होते.