चारधाम यात्रेला गेलेल्या महिलेला पॅरेलिससचा झटका; उपचारासाठी महाराष्ट्रात, प्रकृती स्थिर

By ज्ञानेश्वर भोंडे | Published: September 30, 2022 03:10 PM2022-09-30T15:10:55+5:302022-09-30T17:01:30+5:30

आराेग्य विभाग, स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने महिला महाराष्ट्रात

chardham yatra woman suffers paralysis in maharashtra for treatment condition stable | चारधाम यात्रेला गेलेल्या महिलेला पॅरेलिससचा झटका; उपचारासाठी महाराष्ट्रात, प्रकृती स्थिर

चारधाम यात्रेला गेलेल्या महिलेला पॅरेलिससचा झटका; उपचारासाठी महाराष्ट्रात, प्रकृती स्थिर

Next

पुणे: चारधाम दर्शनासाठी बीडमधून गेलेल्या महिलेला उत्तराखंड येथे मुक्कामी असताना पॅरेलिसिसचा झटका आला. याेग्य उपचारासाठी विमानाने महाराष्ट्रात आणण्याची परवानगीही तेथील डाॅक्टरांनी नाकारली. शेवटी आराेग्य विभाग व स्वयंसेवी संस्था व नातेवाईकांच्या मदतीने या महिलेला ॲंम्ब्यूलन्स करून महाराष्ट्रात आणण्यात आले. सध्या त्यांच्यावर औरंगाबाद येथील खासगी रुग्णालयात उपचार सूरू आहेत.

प्रभावती माने, वय ६५, रा. मन्यारवाडी, तालुका व जिल्हा बीड या दहा बारा दिवसांपूर्वी नातेवाईकांसाेबत उत्तर भारतात चार धाम यात्रा करण्यासाठी गेल्या हाेत्या. उत्तराखंड येथे मुक्कामी असताना त्यांना २४ सप्टेंबरला पहाटे पॅरेलिसिसचा झटका आला व त्यांची शरीराची एक बाज कमकुवत झाली. त्यांना उपचारासाठी तेथील देवभुमी हाॅस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले मात्र काही फरक पडेना.

यानंतर प्रभावती माने यांचे पुतने व सामाजिक कार्यकर्ते सुरेश माने जे दाेन्ही डाेळयांनी अंध आहेत त्यांनी थेट विमानाने दिल्ली गाठली. तसेच त्यांनी चुलतीला विमानाने घेउन येण्याची तयारी केली. परंतू डाॅक्टरांनी परवानगी दिली नाही. यानंतर धर्मराज यांनी तातडीने महारष्ट्राचे आराेग्यमंत्री तानाजी सावंत यांना काॅल केला. यानंतर आराेग्यमंत्रयांचे पीए रविंद्र अनभुले, कृष्णा जाधव यांनी तातडीने दिल्लीचे आराेग्यमंत्री, जिल्हाधिकारी यांना मदतीसाठी संपर्क केला. यावेळी माने यांना ॲंम्ब्यूलन्सने रस्त्याने आणायचे ठरवले. मात्र, उत्तराखंडमधून महाराष्ट्रात १७०० किलाेमीटर येण्यासाठी त्यासाठी ९० हजार रूपये खर्च येत हाेता. परंतू, यावेळी रविंद्र अनभुले यांनी दिल्लीतील प्रशासनाची मदत घेत दिल्लीतील संस्थेला विनंती करून कमी पैशांत महाराष्ट्रात आणण्याची विनंती केली. तेथील संस्था विनाेद अॅम्ब्यूलन्स सव्िर्हस संस्थेने केवळ ४५ हजारांत २७ सप्टेंबरला त्यांना आणले, अशी माहीती सुरेश यांनी दिली.

''माझ्या चुलतीला उपचार मिळण्यापासून तिला पुन्हा महाराष्ट्रात आणण्यासाठी मला महाराष्ट्राच्या आराेग्यमंत्रयांचे स्वीय सहायक रविंद्र अनभुले तसेच केंद्रीय आराेग्यमंत्री भारती पवार यांच्याही प्रशासनाने खूप मदत केली. तसेच यादरम्यान माझे मनाेबल वाढवण्यास मदत केल्याने पुन्हा महाराष्ट्रात सुखरूप परतलाे. आता चुलतीची प्रकृती स्थिर आहे. - सुरेश माने, नातेवाईक तथा सामाजिक कार्यकर्ते''

Web Title: chardham yatra woman suffers paralysis in maharashtra for treatment condition stable

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.