दी इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया (आयसीएआय) पुणे शाखा, स्टुडंट स्किल्स एनरीचमेन्ट बोर्ड (बोर्ड ऑफ स्टडीज), आयसीएआय पुणे
''''''''विकासा'''''''' यांच्या वतीने आयोजित सीए विद्यार्थ्यांसाठीच्या
तीन दिवसीय राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार डॉ. अमोल कोल्हे, ''''''''आयसीएआय''''''''च्या केंद्रीय समितीचे सदस्य चंद्रज्योत सिंह नंदा, एशियन ओशियन स्टॅंडर्ड सेटर्स ग्रुपचे अध्यक्ष डॉ. एस. बी. झावरे, पुणे ''''''''आयसीएआय''''''''चे अध्यक्ष
अभिषेक धामणे, उपाध्यक्ष समीर लड्डा, सचिव काशिनाथ
पाठारे, विभागीय समिती सदस्य यशवंत कासार, गायिका मधुरा दातार, ''''''''विकासा''''''''चे उपाध्यक्ष मन्मथ शेवाळकर आदी उपस्थित होते.
कोल्हे म्हणाले, डॉक्टर माणसांना बरे करतो, तर सनदी लेखापाल अर्थव्यवस्थेला बरे करतात. कोरोनाने आपल्याला जबाबदारीची जाणीव करून दिली आहे. सध्याच्या आर्थिक परिस्थितीतून बाहेर पडण्यात सनदी लेखापालांचे योगदान महत्वाचे असेल.
------