चासकमान : चासकमान परिसरात गेली चार दिवस पडणाऱ्या वळवाच्या मुसळधार पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून चासकमान धरणाच्या भिंतीलासुद्धा मोठ-मोठे खोंगळ (ठासे) पडले आहेत. चासकमान धरण परिसरात गेली दोन दिवस ७५ मिलिमीटर व ४७ मि. मीटर पावसाची नोंद झाली आहे. २३ तारखेला झालेल्या पावसामुळे धरणाच्या भिंतीला पावसाच्या माऱ्यामुळे मोठ मोठे खोंगळ पडले असून, भिंतीची माती खाली वाहून आली आहे. खचलेली भिंतीच्या जागी ताबडतोब भराव केला नाही तर पावसाने खोंगळ मोठे होऊन धरणाला धोका निर्माण होऊ शकतो. यासंदर्भात शाखा अभियंता भुजबळ यांच्याशी संपर्क साधला असता, येथे केलेल्या रस्त्यावरचा जास्त असलेला भराव वाहून गेला आहे. यामुळे धरणाला धोका पोहचू शकणार नाही. (वार्ताहर)
चासकमान धरणाला ‘खोंगळ’
By admin | Published: August 26, 2014 5:06 AM