भोर : सध्याच्या राजकारणात विचारधारा, निष्ठा मागे जाऊन महत्त्वाकांक्षा वाढली आहे. अशा परिस्थितीत अनंतराव थोपटे व संग्राम थोपटे यांनी काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहून आपली निष्ठा जोपासली, असे मत अखिल भारतीय काँॅग्रेस पक्षाचे सरचिटणीस दिग्विजयसिंह यांनी व्यक्त केले.
हरिश्चंद्री (ता. भोर) येथे आमदार संग्राम थोपटे यांच्या प्रचारसभेत दिग्विजयसिंह बोलत होते. या वेळी माजी मंत्री अनंतराव थोपटे, विदुरा नवले, देविदास भन्साळी, शैलेश सोनवणो, स्वरुपा थोपटे, बाळासाहेब थोपटे, गितांजली आंबवले,
आण्णा भिकुले, प्रदीप खोपडे, सुवर्णा मळेकर, दिलीप लोहोकरे, दिलीप हुलावळे, संतोष साखरे, गितांजली शेटे, उमेश देशमुख, प्रमोद कुलकर्णी, कृष्णा शिनगारे, जयश्री शिंदे, डॉ.विजयालक्ष्मी पाठक, किसन वीर, चंद्रकांत सागळे, तानाजी तारू,
राजेश काळे, गजानन शेटे, सविता वाडघरे, पल्लवी सोनवणो, उत्तम थोपटे, दिनेश धाडवे, कैलास ढवळे, सुभाष धुमाळ, जगदीश गुजराथी, जगदीश किरवे, विठ्ठल आवाळे उपस्थित होते.
प्रास्ताविकात शैलेश सेानवणो यांनी आमदारांच्या माध्यमातून तीन तालुक्यांत झालेल्या विकासकामांची माहिती दिली.
या वेळी आमदार संग्राम थोपटे म्हणाले, दर लोकसभा निवडणुकीला यायचं..मेहुण्याचे नाते लावायचे.. दाजी म्हणायचे..मतदान घेऊन जायचे आणि विधानसभा निवडणुकीत पाठीत खंजीर खुपसायचा.. हा दरवेळी खेळ खेळायचा. या वेळी मात्र काहीही नाते लावले, तरी दाजी भुलणार नाही. विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकायला लागल्याने व विकासाचे मुद्दे नसल्याने वैयक्तिक टीका
सुरू आहे. ज्यांचे वय 25 वर्षे
आहे, ते 4क् वर्षे राजकारण करणा:यांवर टीका करीत आहेत. हे बालिशपणाचे लक्षण आहे, त्यामुळे त्यांच्याकडे दुर्लक्ष करा.
दिग्विजयसिंह म्हणाले, सध्याचे राजकारण निष्ठेपेक्षा महत्त्वाकांक्षेचे झाले आहे, म्हणूनच राज्यातील युती तुटून निवडणुकीआधीच मुख्यमंत्री पदावरून भांडणो सुरू आहेत.