शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
3
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
4
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
5
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
6
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
7
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
8
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
9
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
10
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
11
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
12
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
13
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
14
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
15
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
16
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
17
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
18
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
19
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
20
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू

निघोजे-कुरुळी रस्त्याची झाली चाळण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2018 1:20 AM

कुरुळी पंचायत समिती गणातील निघोजे-मोई या चार किमी रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत.

कुरुळी : कुरुळी परिसरातील निघोजे-मोई व कुरूळी- निघोजे रस्त्यांची चाळण झाली असून, रस्त्याच्या दुतर्फा खचलेल्या साईडपट्ट्यांची त्वरित दुरुस्ती करावी, अशी मागणी उपसरपंच अमित मुऱ्हे यांनी केली आहे.गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या रिमझिम पावसाने खेड तालुक्यात औद्योगिक क्षेत्रातील व कुरुळी पंचायत समिती गणातील निघोजे-मोई या चार किमी रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. मोई ते कुरुळी (मुºहे वस्ती) येथून पुणे-नाशिक महामार्गावर रस्त्यावरही मोठमोठे खड्डे पडले असल्यामुळे येथील नागरिकांना व वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे.निघोजे ते मोई या रस्त्यावरून पिंपरी चिंचवड हद्दीत असलेल्या चिखली गावाकडे जाणारी जड मालवाहतुकीची सतत वर्दळ आहे. मोई येथे मोठ्या प्रमाणात क्रशर असल्याने येथे अवजड मालवाहूगाड्यांची वर्दळ असते. त्या मुळे रस्त्याच्या दुरवस्थेत आणखी भर पडली आहे. खड्ड्यांमुळे तसेच त्यात पाणी साचल्याने चालणे व गाडी चालविणे मोठे अवघड झाले आहे.गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू झालेल्या पावसाने कुरुळी, चिंबळी, निघोजे, मोई परिसरातील रस्त्याचे डांबरीकरण उखडल्याने मोठे व खड्डे झाले आहेत. दोन्ही बाजूने साइडट्ट्याही खचल्या आहेत. यामुळे गाड्या चालविणे मोठे अवघड झाले आहे. मुºहे वस्ती येथून पुणे-राष्ट्रीय महामार्गावर चिंबळी फाट्याकडे येणाऱ्या रस्त्यावर साकव पुलाच्या संरक्षणासाठी असलेल्या लोखंडी अँगलची दुरवस्था झाली आहे. या साकव पुलावर डोंगरेवस्ती येथील पावसाचे पाणीही येत असल्याने या ठिकाणाहून जाणे-येणे अवघड झाले आहे. कुरुळी, मोई, निघोजे परिसरातील रस्त्याची त्वरित दुरुस्ती करावी, अशी मागणी सरपंच चंद्रकांत बधाले, अरुण फलके, रमेश गायकवाड, उपसरपंच आशिष येळवंडे, सरपंच शरद मुºहे,अमित मुºहे, संजय मुºहे, संतोष मुºहे, दिलीप मेदनकर आदी ग्रामस्थांनी केली आहे.

टॅग्स :Potholeखड्डेPuneपुणेroad transportरस्ते वाहतूक