पुणे : फायन्सांस कंपनीतून कर्ज मिळवून देण्याच्या बहाण्याने एकाची 3 लाख 26 हजारांची फसवणूक केल्याचा प्रकार सिंहगड रोड परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी चंद्रशेखर गोविंद कुलकर्णी (वय-53,रा.धायरी) यांनी तक्रार दिली.
याबाबत तीन मोबाईलधारक व चार बँकेच्या खातेधारक यांच्या विरुद्ध सिंहगड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार ऑक्टोबर 2018 ते गुन्हा दाखल होईपर्यंतच्या कालावधीत घडला आहे. फिर्यादीच्या मोबाईलवर एका अनोळखी क्रमांकावरून फोन आला. यावेळी समोरील व्यक्तीने आपण फायन्सास कंपनीतून बोलत असल्याचे सांगितले. यानंतर देखील फिर्यादींना चार ते पाच वेळा फोन करून कर्ज घेणार आहात का? अशी विचारणा केली. फिर्यादींना कर्जाची गरज असल्यामुळे त्यांनी ते घेतले. त्यानंतर विविध प्रोसेस,जीएसटी च्या नावाखाली आरोपींनी फिर्यादींना सातत्याने 3 लाख 26 हजार ट्रान्सफर करण्यास भाग पाडले. मात्र खूप कालावधी होऊन देखील कर्ज मिळत नसल्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. पुढील तपास गुन्हे निरीक्षक क्रांतिकुमार पाटील करीत आहेत