शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
2
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
3
टी-२० मालिका : युवा भारतीयांची ‘कसोटी’, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध छाप पाडण्याची संधी
4
चॅम्पियन्स ट्रॉफी : पाकिस्तान हायब्रिड मॉडेलसाठी तयार, भारताचे सामने यूएईमध्ये रंगण्याची शक्यता
5
डब्ल्यूपीएल : हरमन, स्मृती, जेमिमा रिटेन
6
मला तो पक्ष नको, चिन्ह नको अजित पवारांना लखलाभो; सुप्रिया सुळेंनी बंडापूर्वी काय घडले ते सांगितले...
7
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना
8
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
9
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
10
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
11
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
13
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
14
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
15
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
16
WPL 2025 Retention: स्मृती ते हरनमप्रीत! इथं पाहा ५ संघातील रिटेन-रिलीज खेळाडूंची संपूर्ण यादी
17
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
18
मुंबईत एकनाथ शिंदे - उद्धव ठाकरेंमध्ये कोण वरचढ?; 'या' ११ जागा ठरणार निर्णायक
19
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
20
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?

मावस भावानेच व्यवसायात फसवले; आळंदीत तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2017 2:02 PM

मानलेल्या मावस भावाने व्यवसायात फसवणूक केल्याने एकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार आळंदीत घडला.

लोणी काळभोर : भागीदारीत सुरू केलेल्या टुर्स अँन्ड ट्रँव्हल्सच्या धंद्यात मानलेल्या मावस भावानेच फसवणूक केल्याने आलेल्या नैराश्यातून एकाने गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याची घटना आळंदी म्हातोबाची ( ता. हवेली ) येथे घडली आहे. याप्रकरणी आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या कारणांवरून पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यांत आला आहे.या घटनेंत रवी महादेव शेंडगे (वय ४५) यांनी आत्महत्या केली आहे. त्यांची पत्नी शेंडगे (वय ३८, रा. मगरवस्ती, आळंदी म्हातोबाची, ता. हवेली) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अंकुश शशिकांत कांबळे (रा. सर्वे क्रमांक ४६, धानोरी रोड, बुद्धविहाराजवळ, विश्रांतवाडी, पुणे ), अनिल बाळासाहेब जवळकर व विशाल निवृत्ती जवळकर (दोघेही रा.आळंदी म्हातोबाची, ता. हवेली), धनाजी जिजाबा गुंजवटे (रा. सोरतापवाडी, ता. हवेली), व मनोज अर्जुन गवळी (रा. कदमवाकवस्ती, ता. हवेली) या ५ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलीस निरिक्षक बंडोपंत कोंडूभैरी यांनी दिलेल्या माहितीनुसार रवी शेंडगे हे घोरपडी, पुणे येथे जेवणाची मेस चालवत होते. त्यांचा मानलेल्या मावस भाऊ अंकुश कांबळे या दोघांनी पुणे येथील एका हॉटेलमध्ये एकत्र काम केले असल्याने दोघांची चांगली ओळख होती. ७ जुलै रोजी कांबळे हा शेडगे यांचे घरी आला व त्याने माझ्या विश्रांतवाडी, पुणे येथील टुर्स अँड ट्रँव्हल्सच्या व्यवसा य करार संपल्याने दुसरे ऑफिस टाकायचे आहे. सदर व्यवसाय आपण दोघे भागीदारीत करू मला टाटा कम्युनिकेशन सर्विस या कंपनीचे टेंडर मिळाले आहे. यासाठी तु तुझ्या ओळखीच्या व्यक्तींकडून गाड्या मागवून घे असे सांगीतले.शेंडगे स्थानिक असल्याने सदर कामासाठी काही जणांनी गाड्या देण्याची तयारी दर्शवली. यानंतर कांबळे याने गाड्या आपण कंपनीला लावत आहोत त्या सर्व गाड्यांचा करार तुझ्या नावावर कर. प्रतिगाडी ५० हजार रूपये प्रतिमहा गाडीमालकांंस देण्यात येणार असून गाडीची नोंदणी करण्यांसाठी ५ हजार ५०० रूपये प्रतिगाडी घ्या असे शेंडगे यांना सांगीतले. त्यानुसार रवी शेंडगे यांनी अनिल जवळकर, विशाल जवळकर, धनाजी गुंजवटे, मनोज गवळी या चौघांसमवेत इतर ३६ असे एकून ४० जणांच्या गाड्यांचा करार त्यांनी आपल्या नावे करून घेतला. व प्रतिगाडी जमा केलेले ५ हजार ५०० रूपये त्यांनी कांबळे याचेकडे दिले. कांबळे याने गाड्या कोणत्याही कंपनीला लावल्या नाहीत हे लक्षात आल्यानंतर वरील चौघे शेंडगे यांच्याकडे पैशाची मागणी करू लागले. घरी येवून दमदाटी करून पैसे दे अन्यथा तुझे घर अामच्या नावावर कर अशी मागणी फोनवरून वारंवार करून शिवीगाळ, दमदाटी करू लागले.९ ऑक्टोंबर रोजी त्यांनी घरांची सर्व कागदपत्रे नेली तेव्हापासून शेंडगे मानसिक तणावाखाली वावरत होते. अखेर त्यांनी ११ ऑक्टोंबर रोजी सर्वजण घरातझोपले असताना पहाटे ५च्या सुमारास घराच्या पत्र्याच्या छतास असलेल्या बांबूला नायलॉनची दोरी बांधून आत्महत्या केली.

टॅग्स :Suicideआत्महत्याCrimeगुन्हाPuneपुणे