शहरं
Join us  
Trending Stories
1
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
2
Mumbai Metro 3 Fire BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
3
“राहुल गांधींच्या सभांना प्रचंड प्रतिसाद, PM मोदींची हवा संपली, रिकाम्या खुर्च्यांना संबोधन”
4
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
5
एकदम कडक! WhatsApp वर येणार दमदार फीचर; मेसेजची 'ही' मोठी समस्या होणार दूर
6
शेअर बाजारातील घसणीचा टप्पा हा तात्पुरता, परदेशी गुंतवणूकदार बाजारात परतणार : रामदेव अग्रवाल 
7
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
8
विधेयक फाडलं अन् संसदेत केला आगळावेगळा डान्स; महिला खासदाराचा व्हिडिओ व्हायरल
9
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
10
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
11
तिसरी बार, १०० पार; भाजपाला 'ही' हॅटट्रिक जमेल? नेमकं कसं आहे समीकरण
12
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
13
"लादीवर झोपवायचे म्हणता, तुमच्या वडिलांना विचारा, तेव्हा...;" रामदास कदम यांची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका 
14
श्रद्धा वॉकर हत्याकांडातील आरोपी आफताब बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर, तिहार प्रशासन सतर्क
15
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
16
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
17
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
18
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
19
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब

प्रवेश देण्याच्या बहाण्याने फसवणूक

By admin | Published: May 23, 2017 5:36 AM

शहरातील नामवंत खासगी महाविद्यालयात एम.बी.बी.एस. या वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळवून देण्याचे अमिष दाखवून एका विद्यार्थिनीची १५

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : शहरातील नामवंत खासगी महाविद्यालयात एम.बी.बी.एस. या वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळवून देण्याचे अमिष दाखवून एका विद्यार्थिनीची १५ लाख रुपयांची फसवणूक करुन ५ वर्षे गुंगारा देणा-या मध्यस्तास त्या महिलेने नागरिकांच्या मदतीने पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. शुक्रवार पेठेत राहणा-या २४ वर्षीय तरुणीने फिर्याद केली आहे. त्या सध्या बीएचएमएस फॅकल्टीमध्ये शिकत आहेत. अमित मांडकचंद कासलीवाल (वय ३९, गंगा कार्नेश, कोरेगाव पार्क) याच्यावर मार्केटयार्ड पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अटक केली आहे. त्याला ३ दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर या विद्यार्थीनीला एम.बी.बी.एस.मध्ये प्रवेश हवा होता. कासलीवाल हा स्क्रॅप विकत घेण्याचा व्यवसाय करत होता. त्याने तरुणीचा विश्वास संपादन करुन वेळोवेळी पैसे मागितले. सुरुवातीला तीन ब्लँक चेक घेऊन २०१० पासून २०१२ पर्यंत वेळोवेळी १५लाख रुपये घेतले. नंतर प्रवेश मिळू शकत नसल्याचे सांगून पैसे परत देण्याचे अमिष दाखविले. ५ वर्षे तो गायब होता. कोरेगाव पार्क भागात एका हॉटेलजवळ तो दिसल्यानंतर या तरुणीने नागरिकांच्या मदतीने त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. लग्नाच्या अमिषाने बलात्कार करणाऱ्यांना कोठडीलग्नाचे अमिष दाखवून अल्पवयीन मुलीशी वेळोवेळी शारिरिक संबंध ठेवल्याप्रकरणी दोन वेगवेगळ्या खटल्यांमध्ये आरोपींंना पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने सोमवारी दिले. एका प्रकरणात आतिक तैय्यब शेख (वय २०, रा. पवननगर, अप्पर डेपो) याला कोंढवा पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी फिर्याद दाखल केली आहे. गेल्या चार महिन्यांपासून आरोपीने पिडीत मुलीवर अत्याचार केले, तिला लग्नाचे अमिष दाखवून आरोपीने वेळोवेळी तिच्यावर अत्याचार केले. बाहेरगावी पळवून नेवून शारिरिक संबंध ठेवले. हा प्रकार कोणाला सांगू नये, अशी धमकी दिली.अन्य प्रकरणात सागर शिवाजी शिंदे (वय २३, रा. मु पो. गारडी) याला हडपसर पोलिसांनी अटक केली .