पुणे- बनावट कागदपत्रे आणि पासपोर्ट तयार करून परदेशात डॉक्टरकी करीत असलेल्या मित्राची फसवणूक केल्याची बाब उघड झाली आहे. ऑस्ट्रेलियातील मेडिकल काऊंसिलच्या मेलमुळे हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी बोगस डॉक्टरवर दत्तवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्याम आचार्य असे बोगस डॉक्टरचे नाव आहे. प्रकाश चितळे ( वय 76 रा.सिहंगड रस्ता) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा मुलगा सारंग चितळे आणि श्याम आचार्य याची 1999 मध्ये एके ठिकाणी प्रॅक्टीस करत असताना ओळख झाली. सारंगचे आईवडिल हे इंग्लंड व अमेरिकेमध्ये राहात असल्याने श्याम नंतर त्याच्याबरोबर त्याच्या घरी राहायला आला. आजी, सारंग आणि श्याम असे तिघे एकत्र राहात होते. 2000 साली सारंगची एमबीबीएस, मेडिकल कौन्सिलची सर्टिफिकेट गहाळ झाली त्यामुळे त्याने पुणे विद्यापीठाकडून ती पुन्हा मागवून घेतली. त्यानंतर तो इंग्लंडला गेल्यानंतर श्याम हा आजीबरोबर तिच्या घरी राहायला गेला. फसवणूक केल्याने आजीने त्याला घरात हाकलून दिले. यादरम्यान सारंग भारतात परत आला. श्याम आजीच्या घरी त्याची बँग विसरला होता त्यामध्ये सारंगची गहाळ झालेली सर्टिफिकेट मिळाली. त्यावर त्याने स्वत:चा फोटो लावला होता. सारंगला संशय आला. इंग्लंडला परत गेल्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या मेडिकल काऊंसिलकडून सारंगला मेल आला की तुमच्या नावाने डॉक्टर म्हणून एक व्यक्ती इथे प्रॅक्टीस करीत आहे, कौन्सिलने तक्रार दाखल केल्यानंतर तिथल्या तपास अधिका-याने त्याच्याशी व्हिडिओ कॉंन्फरसिंगद्वारे संवाद साधला. काऊंसिलच्या तक्रारीनंतर श्याम ऑस्ट्रेलियातून फरार झाला. मागच्या महिन्यात सारंगचे आईवडिल पुण्यात आले त्यांनी सायबर सेलकडे अर्ज केला. संपूर्ण चौकशी केल्यानंतर श्याम आचार्यवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तो मूळचा कर्नाटकमधला असल्याचे सांगितले जात आहे. सध्या तो बँकॉंकमध्ये असून, भारतात येण्याची शक्यता असल्याचे दत्तवाडीचे पोलीस उपनिरीक्षक कुलदीप संकपाळ यांनी सांगितले.
बनावट कागदपत्रे आणि पासपोर्ट तयार करून परदेशात डॉक्टरकी करीत असलेल्या मित्राची फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2017 4:50 PM
बनावट कागदपत्रे आणि पासपोर्ट तयार करून परदेशात डॉक्टरकी करीत असलेल्या मित्राची फसवणूक केल्याची बाब उघड झाली आहे.
ठळक मुद्देबनावट कागदपत्रे आणि पासपोर्ट तयार करून परदेशात डॉक्टरकी करीत असलेल्या मित्राची फसवणूक केल्याची बाब उघड झाली आहे. ऑस्ट्रेलियातील मेडिकल काऊंसिलच्या मेलमुळे हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.