- विवेक भुसेपुणे : ओएलएक्स या संकेतस्थळावरुन जुन्या वस्तूची खरेदी विक्री करण्यासाठी एक चांगला पर्याय लोकांना उपलब्ध झाला असला तरी, राजस्थानातील अलवर जिल्ह्यातील अल्पवयीन मुले लोकांची फसवणूक करीत असल्याचे उघडकीस आले आहे़झारखंडमधील नक्षलग्रस्त गावांमध्ये कॉल सेंटर चालवून तेथून देशभरातील नागरिकांना आमिष दाखवून सायबर क्राईमच्या माध्यमातून फसवणूक करणाऱ्याची मोठी संख्या यापूर्वी होती़ पण झारखंड पोलिसांनी राबविलेल्या मोहिमेमुळे तेथून होणाºया फसवणुकीच्या गुन्ह्यांमध्ये घट झाली आहे़ पण, आता राजस्थानमधून होणाºया सायबर गुन्ह्यांमध्ये चक्क अल्पवयीन मुलांचा सहभाग तोही मोठ्या प्रमाणावर असल्याचे दिसून आले आहे़ सायबर सेलकडे अशाच दोन तक्रारी आल्या होत्या़ या दोन्ही गुन्ह्यांमध्ये आरोपींची मोडस एकच असल्याचे दिसून आले़
ओएलएक्सच्या माध्यमातून अल्पवयीनांकडून फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2018 4:58 AM