पुणे : पुढील काळात जिल्ह्यातील ३० गावांना चाराटंचाईची झळ बसू शकते. येथील २२ हजार ५१८ जनावरांना प्रतिदिन २८ हजार ७५० मेट्रिक टन चारा लागू शकतो, असा प्राथमिक अहवाल जिल्हा पशुसंवर्धन विभागाने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडे दिला आहे. ‘त्या’ गावांसाठी चारा छावणी/ डेपासाठी चाचपणी सुरू झाली आहे. गेल्या आठवड्यात टंचाईसंदर्भात झालेल्या आढावा बैैठकीत चारा छावणी व डेपोची मागणी लोकप्रतिनिधींनी केली होती. १९व्या पशुगणनेनुसार म्हणजे २०१२ या वर्षातील आकडेवारी प्रशासनाकडे उपलब्ध आहे. त्यामुळे मागणी झालेल्या गावांत नेमकी आजच्या घडीला किती जनावरे आहेत, याचे ठोस उत्तर प्रशासनाकडे नव्हते. या वेळी मोरगाव या एका गावाच्या जनावरांच्या स्थितीचा आढावा घेतला असता त्यात मोठी तफावतही दिसून आली होती. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी टंचाईग्रस्त गावांचे सर्वेक्षण करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते.जिल्हा पशुसंवर्धन विभागाने तालुकानिहाय जनावरांची संख्या व प्रतिदिन द्यावयाचे चाऱ्याचे प्रमाण अंतिमत: निश्चित करून तत्काळ अहवाल सदार करावा. कृषी विभागाने सर्व पिकांपासून उपलब्ध होणारा चारा, भविष्यातील चाराटंचाई विचारात घेऊन वैरण विकास कार्यक्रमांतर्गत करायचे बियाणेवाटप, त्यासाठी आवश्यक निधी, याबाबत प्रस्ताव आवश्यक असल्यास सादर करावा, असे आदेश दिले होते.त्यानुसार पशुसंवर्धन विभागाने संभाव्य चाराटंचाईग्रस्त गावांकरिता आवश्यक चाऱ्याचा प्राथमिक अहवाल प्रशासनाला दिला आहे. त्यानुसार, जिल्ह्यातील ३० गावांत २२ हजार ५१८ जनावरांना दरदिवशी २८ हजार ७५० मेट्रिक टन चारा लागू शकतो, असे कळविले आहे. या ३० गावांत १५ हजार ७७४ मोठी व ६ हजार ७४४ लहान जनावरे आहेत. मोठ्या जनावरांना १५ किलो, तर लहान जनावरांना ७.५ किलो चारा दरदिवशी लागेल.शेळ्या-मेंढ्यांचाही चाऱ्यामध्ये समावेशटंचाईत यापूर्वी शेळ्या-मेंढ्यांना चारा पुरविणे बंधनकारक नव्हते. मात्र, या वर्षी शासनाने शेळ्या-मेंढ्यांनाही चारा पुरवावा, असे कळविले आहे. त्यामुळे चारा छावणी किंवा डेपोत त्यांचाही समावेश होणार आहे.
तीस गावांसाठी ‘छावणी’ची चाचपणी
By admin | Published: May 03, 2016 3:25 AM