कुरकुंभ : खडकी (ता. दौंड) येथील न्यू बब्बी ढाबासमोर शुक्रवारी (दि. 31) रात्री साडेअकराच्या सुमारास अपघात होऊन मेथेनॉल रसायनाने भरलेला टँकरमध्ये स्फोट होऊन लागलेल्या आगीत तीन ट्रक जळून खाक झाले, तर वाळूवाहतूक करणारा ट्रकचालक नागेश बाळू लांडे (वय 25, रा. परिते, ता. माढा, जि. सोलापूर) यांचा जागीच जळून दुर्दैवी मृत्यू झाला, तर टँकरचालक विक्रम गव्हाणो व त्याचा साथीदार दैव बलवत्तर म्हणून वाचले. शनिवारी सकाळी अपघाताची वार्ता समजताच अनेक ग्रामस्थांनी घटनास्थळी मदतीसाठी धाव घेतली.
रसायनाने भरलेला टँकर (क्र. एमएच 04 एफडी 8577) हा मुंबईहून सोलापूरकडे जात असताना, त्याला पाठीमागून वाळूच्या ट्रकने (क्र. एमएच 12 एफङोड 7295) जोरात धडक दिल्यामुळे टँकरमधील मिथेनॉल रसायनाचा स्पोट होऊन आग लागली.
वाळूच्या ट्रकमधील वाहन चालकाला खाली उतरण्याची देखील संधी मिळालाही नाही. त्यामुळे त्याचा जागीच जळून मृत्यू झाला तर रसायनाने भरलेला टँकर धडकेमुळे न्यू बब्बी ढाब्यासमोर जाऊन थांबला; मात्र मागच्या बाजूने आग लागल्यामुळे त्यांना पळण्याची संधी मिळाली, तर ढाब्यावर जेवणासाठी थांबलेला ट्रक (क्र. एमएच 04 ईबी 2290) हादेखील जळाला. यामध्ये मोठय़ा प्रमाणात कॉम्प्युटर होते. तेही जळून खाक झाले. रात्री 11.30 च्या सुमारास झालेल्या प्रकारानंतर पोलिसांनी वेळीच दखल घेऊन अग्निशामक दलाला प्रचारण केले. यामध्ये कुरकुंभ औद्योगिक वसाहतीमधील अग्निशामक दल, कारगीर कंपनी, कोणार्क लॅब तसेच बारामती नगर परिषदेच्या दलाने आग विझवली. पहाटे आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशामक अधिकारी दिलीप माने, मोहन जाधव, बालाजी ओव्हाळ व अन्य सहकारी तसेच विविध ठिकाणच्या अग्निशामक अधिकारी यांचा समावेश होता.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र मोरे, पोलीस निरीक्षक सजन हंकारे तसेच संजय थोरात, ज्ञानदीप दिवाण, राजेंद्र साबळे, अजय देवकाते, अविनाश कांबळे यांनी घटनास्थळी भेट दिली. (वार्ताहर)
4पुणो- सोलापूर महामार्गावर लागलेल्या भीषण आगीमुळे काही काळ रस्ता वाहतुकीस बंद ठेवण्यात आला होता. घटना इतकी गंभीर होती, की पेटलेल्या रसायनाच्या टँकरमध्ये आगीचे तांडव चालेले होते. एकाच वेळी वाहने जळत असल्यामुळे पोलीस व अग्निशामक अधिका:यांची पळापळ झाली.