बारामती: येथे छत्रपती शाहू महाराज यांची जयंती भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा स्मारक या ठिकाणी शनिवारी (दि. २६) साजरी करण्यात आली.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेला पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे, छत्तीसगडचे पोलीस अधिकारी अजय शेलार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून त्रिशरण पंचशील ग्रहण करण्यात आले. तर माजी नगराध्यक्ष कैलास चव्हाण, बसपाचे काळुराम चौधरी, सवाणे गुरुजी, प्रा. नीलकंठ ढोणे,अॅड.विनोद जावळे यांनी छत्रपती शाहू महाराजांनी केलेल्या ऐतिहासिक कार्याच्या स्मृतींना उजाळा देत मनोगत व्यक्त केले.
दरम्यान, या वेळी ‘शाहू महाराजांची जयंती एखाद्या सणाप्रमाणे साजरी करा’ या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या वाक्याचा संदर्भ देत विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती महोत्सव समितीच्या वतीने उपस्थितांना लाडू वाटप करून तोंड गोड करण्यात आले. या वेळी माजी उपनगराध्यक्ष भारत अहिवळे, विलास शेलार, नगरसेवक सूरज सातव, बिरजू मांढरे, नगरसेविका अनिता जगताप, माजी नगरसेविका आरती शेंडगे, जिजाऊ ब्रिगेडच्या तालुका अध्यक्षा प्रा.सुषमा जाधव, सचिव प्रा. शीलाराणी रंधवे, कार्याध्यक्षा प्रा.विद्याराणी चव्हाण, मराठा सेवा संघाचे दीपक भराटे आदी उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जयंती महोत्सव समितीचे सदस्य गौतम शिंदे, अॅड.सुशिल अहिवळे, प्रा.रमेश मोरे, चेतन शिंदे, गजानन गायकवाड, सोमनाथ रणदिवे,चंद्रकांत भोसले, शंकर गव्हाळे आदींनी परिश्रम घेतले.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा स्मारक येथे छत्रपती शाहू महाराज जयंती साजरी करण्यात आली.
२६०६२०२१-बारामती-१७