धनकवडी: स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांना राष्ट्रपुरुष म्हणून घोषित करा. तसेच त्यांची प्रतिमा सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयामध्ये लावण्यात यावी, अशी मागणी धनकवडी मधील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पोपटराव खोपडे यांनी केली आहे.
स्वराज्याची पहिली राजधानी असलेल्या राजगड किल्ला हा वेल्हे तालुक्यात असल्याने, वेल्हे तालुक्याचे तहसीलदार शिवाजी शिंदे यांना छत्रपती संभाजी महाराज यांची प्रतिमा आणि आपल्या मागण्याच निवेदन देऊन समस्त खोपडे परिवाराच्या वतीने पोपटराव खोपडे यांनी ही मागणी केली आहे.
खोपडे म्हणाले की, छत्रपती संभाजी महाराजांनी केलेल पराक्रम, त्याची किर्ती, निती, राष्ट्रकार्य स्मरून त्यांची गणना राष्ट्रपुरुषाच्या यादीत व्ह्याला हवी. तसेच सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयांमध्ये छत्रपती संभाजी महाराजांची प्रतिमा लावण्याबाबत शासनाने अध्यादेश काढावेत. याविषयीचा ठराव विधान सभा आणि विधान परिषदेमध्ये मांडून एकमताने मंजूर करावे, अशी मागणी पोपटराव खोपडे यांनी केली आहे.
राज्यातील राष्ट्रपुरुषांच्या यादी मध्ये सध्या ३७ राष्ट्र पुरुषाच्या नावाचा समावेश आहे. मात्र छत्रपती संभाजी महाराजा सारख्या चारित्र्यवाण, नितीवंत, स्वराज्य रक्षक, महा पराक्रमी राज्याच नाव राष्ट्रपुरुषाच्या यादीत नसल्याची खंत आम्हा मावळातील लोकांनमध्ये असल्याने आंम्ही आमच्या मागण्याच निवेदन वेल्हे तहसीलदारांना दिल असल्याचं खोपडे यांनी सांगितलं.
यावेळी योगेश खोपडे, सचिन खोपडे, संतोष खोपडे, कानिफनाथ खोपडे आणि रोहन खोपडे उपस्थित होते. कोरोना नियम सोशल डिसटन्सचे सर्व नियम पाळून समस्थ खोपडे परिवाराच्या वतीने हे निवेदन वेल्हे तहसीलदारांना देण्यात आलं आहे.