शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
3
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
4
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
5
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
7
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
8
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
9
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
10
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
11
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
12
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
13
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
14
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
15
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
16
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
17
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
18
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
19
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
20
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन

छत्रपती शिवाजी महाराज देशाचेच नव्हे तर जगाचे 'हिरो': भगत सिंह कोश्यारी यांचे गौरवोद्गार  

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2021 17:05 IST

"छत्रपती शिवाजी महाराज आमचे अभिमान आणि स्वाभिमान..'' : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

पुणे : आपल्या राजकीय जीवनात छत्रपती शिवाजी महाराज नवीन अवतारी पुरुष म्हणून आलेले आहे. त्यांच्या युक्ती, बुद्धी, शक्तीचं गुणगान इतिहासकारांनी केलं आहे. शिवाजी महाराजांनी देशात नवी चेतना जागृत केली. त्यामुळे शिवाजी महाराज हे फक्त भारताचेच नाही, तर जगाचे हिरो बनले आहेत अशा गौरवोद्गार राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी काढले आहे. 

भगत सिंह कोश्यारी हे तीन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर आहे. याच दौऱ्यादरम्यान त्यांनी सोमवारी(दि.१६) त्यांनी सकाळी सिंहगडाला भेट दिली. यावेळी त्यांनी गडाची पाहणी करत छत्रपती शिवाजी महाराज व तानाजी मालुसरेंना अभिवादन केलं. तसेच काही ठिकाणी वृक्षारोपणही करण्यात आले. यावेळी आमदार भीमराव तापकीर, आमदार मुक्ता टिळक, राज्यपालाचे विशेष सचिव राकेश नैथानी, उपवनसंरक्षक राहुल पाटील, पुरातत्व खात्याचे सहायक संचालक विलास वाहने, उपविभागीय अधिकारी सचिन बारवकर यांच्यासह सर्व संबंधीत विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थितीत होते. 

यावेळी कोश्यारी म्हणाले, "छत्रपती शिवाजी महाराज आमचे अभिमान आणि स्वाभिमान आहेत. त्यांच्यासारख्या इतर थोर राष्ट्रपुरुषांबद्दल बालकांना सुरुवातीपासून शिक्षण दिले पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त करत नरवीर तानाजी मालुसरे यांचा इतिहास तसेच त्यांच्या त्याग व बलिदानाबद्दल बालकांना शिक्षण दिल्यास आपल्या देशात नरवीर तानाजी मालुसरे व छत्रपती शिवाजी महाराज घडतील, असा विश्वास राज्यपाल कोश्यारी यांनी व्यक्त केला. तसेच शिवाजी महाराजांनी मोगल साम्राज्याचा शेवट करत युक्ती, बुद्धी आणि शक्तीचा त्रिवेणी संगम घालून राज्य केले. छत्रपती शिवाजी महाराज व तानाजी मालुसरे यांनी गाजविलेल्या अद्वितीय पराक्रमाचा इतिहास शिक्षणाच्या माध्यमातून मुलांपर्यंत पोहचणं गरजेचे आहे. 

सिंहगडवासियांच्या पाहुणचाराने राज्यपाल भारावले...सिंहगडवासियांनी राज्यपालांच्या स्वागतासाठी अप्रतिम रांगोळ्या काढल्या होत्या. तसंच महिलांनी त्यांना औक्षण देखील केलं. नागरिकांच्या स्वागताने कोश्यारी भारावले. तसेच उत्तराखंडमध्ये देखील असेच गड आहे. तुम्ही एकदा तिकडे या अशाप्रकारे राज्यपालांनी सिंहगडवासियांना उत्तराखंडला येण्याचे आमंत्रणही दिले. 

शिवशार बाबासाहेब पुरंदरे यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी हजेरी लावली. यावेळी राज्यपाल महोदयांनी पुरंदरे यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव केला. तसंच अखंड आयुष्य शिवरायांप्रती वाहून घेतल्याने त्यांना धन्यवाद दिले.

टॅग्स :Puneपुणेsinhagad fortसिंहगड किल्लाbhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारीShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराज