चाकण : पराक्रमी, शूर, कर्तव्यदक्ष, आणि कुशल प्रशासक म्हणून अल्पवयात नावलौकिक मिळविलेले शिवाजीराजे हे सामाजिक व वैज्ञानिक क्रांतीचे प्रेरक होते. त्यांचा आदर्श आजच्या पिढीला चालना व प्रेरणा देणारा एक चालता बोलता इतिहास आहे. म्हणूनच नुसत्या जयंत्या, उत्सव साजरे करण्यापेक्षा राजांचे आचार-विचार प्रत्येकाने आचरणात आणणे ही काळाची गरज आहे,’ असे प्रतिपादन वरीष्ठ पोलीस निरीक्षक अशोक राजपूत यांनी येथे व्यक्त केले.
सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चा येथे आयोजित करण्यात आलेल्या शिवजयंती उत्सवात चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक राजपूत यांच्या हस्ते शिवप्रतिमेचे पूजन करून प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी मराठा क्रांती मोर्चाचे समन्वय मनोहर वाडेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष राम गोरे, नाट्य चित्रपट निर्माते भगवान मेदनकर, माजी सरपंच प्रीतम परदेशी, माजी आदर्श सरपंच अशोक मांडेकर, ग्रा. पं. सदस्य दत्तात्रय मांडेकर, विजय खाडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष राहुल नाईकवाडी, उद्योजक राहुल नायकवाडी, अतिष मांजरे आदी उपस्थित होते. सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चाने शिवजयंतीचे औचित्य साधून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिवजयंती सोहळा शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करून साजरा करण्यात आला.
- चाकण येथे उपस्थित मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन केले.