समधीस्थळी अत्यंत अाध्यात्मिक महत्त्व असलेला ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समधीवरील अजान वृक्षाचे व रक्तचंदन वृक्षाचे (ज्या भूमीत छत्रपती संभाजी महाराजांचं रक्त सांडलं आणि ज्यांनी आयुष्यभर हिंदवी स्वराज्य आणि धर्मरक्षणासाठी चंदनासारखा स्वतःचा देह झिजवला म्हणून रक्तचंदन) या वृक्षाचे रोपण, सह्याद्रीतील गडकोटांवरील माती व जल तसेच गंगाजलासह, महाराष्ट्रातील पावित्र जलकुंडातील जल या वृक्षांच्या रोपण करताना अर्पण केले. याप्रसंगी वनस्पती शास्त्रज्ञ डॉ. सचिन पुणेकर यांनी अजान वृक्षाचे आणि रक्तचंदन रोपनामागची भूमिका आणि अाध्यात्मिक अधिष्ठान सर्वांस सांगितले.
उपक्रमाचे नियोजन हे वढू बु. ग्रामस्थ, डॉ. सचिन पुणेकर, मिलिंद गायकवाड, अविनाश मरकळे, चंद्रकांत पाटील, अनिल शिवले, संतोष शिवले, जितुकाका खानविलकर, आदित्य मांजरे, धनाजी म्हस्के आणि शिव-शंभूप्रेमींनी केले.