पिंपरी : राज्याचा प्रमुख या नात्याने राज्याची राज्य एकसंध ठेवणे, हे मुख्यमंत्र्याचे आद्यकर्तव्य ठरते. परंतु मुख्यमंत्री पदावर येताच महाराष्ट्रपासून विदर्भ वेगळा करण्याची भूमिका घेतली जाते. मराठी माणसाच्या त्यागातून साकारलेल्या या राज्याच्या अखंडतेला बाधा आणणारे देवेंद्र फडणवीस हे पहिले मुख्यमंत्री आहेत. अशी टीका माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी सांगवी येथे व्यक्त केली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ सांगवी येथे माजी केंद्रीय मंत्री पवार यांची सभा झाली. त्या वेळी ते बोलत होते. महापौर शकुंतला धराडे, शहराध्यक्ष संजोग वाघेरे, माजी आमदार विलास लांडे आदी उपस्थित होते. ते म्हणाले, ‘‘गुजरातपासून महाराष्ट्र वेगळा करण्यासाठी संयुक्त महाराष्ट्राचा लढा दिला गेला. त्यात मराठी माणसाचे रक्त सांडले. मराठी भाषिकांच्या त्यागातून महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले. ही मराठी अस्मिता जपण्याऐवजी तोडण्याचे काम राज्याच्या प्रमुखाकडून केले जात आहे. ही दुर्दैवाची बाब आहे.’’ सांगायचे तात्पर्य राज्याच्या प्रश्नांची माहिती असलेली व्यक्ती मुख्यमंत्री असली पाहिजे. यांच्या हातून राज्याची जपणूक होणार नाही. आधी त्यांनी नागपूरचा विकास करून दाखवावा, असे पवार म्हणाले.(प्रतिनिधी)मुख्यमंत्र्यांची इतिहासातील पहिलीच सभा राज्याच्या मुख्यमंत्र्याच्या पुण्याच्या सभेला नागरिकांची उपस्थिती अगदी नगण्य असावी, ही राज्याच्या इतिहासातील पहिलीच वेळ आहे. नागरिकांनी सभेकडे पाठ फिरवली हे लक्षात येताच मुख्यमंत्री व्यासपीठाकडे फिरकलेच नाहीत. सभेला लोक नसतील, तर इकडून तिकडे गेलेल्यांच्या कानात सांगा, असे म्हणण्याची वेळ आली असल्याचा उल्लेख माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी सांगवीतील सभेत केला.
मुख्यमंत्र्यांमुळे अखंडतेला बाधा
By admin | Published: February 19, 2017 4:46 AM