पुणे - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महापालिकेतील सत्ताधारी भाजपाकडून शहरातील विविध विकासकामांचा धडाका सुरू केला आहे. येत्या शनिवारी (दि. ९) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सणस मैदानावर दुपारी ३ वाजता स्मार्ट सिटीच्या अंतर्गत स्मार्ट इलेक्ट्रिक बस, स्मार्ट सिटी आॅपरेशन्स सेंटर, आॅफिस राइड, बाणेर येथील स्मार्ट रस्ते पुनर्रचना, प्लेसमेकिंग साइट, स्मार्ट स्कूल्स आणि सायन्स पार्क आदी सात प्रकल्पांचे उद्घाटन करण्यात येणार असल्याची माहिती महापौर मुक्ता टिळक यांनी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी आयुक्त सौरभ राव उपस्थित होते.राजीव गांधी इन्फोटेक पार्कला येणाऱ्या सुमारे साडेतीन लाख कॉर्पोरेट कर्मचाºयांना दैनंदिन प्रवासासाठी पर्याय उपलब्ध होणार आहे. स्मार्ट रस्ते पुनर्रचन अंतर्गत पुणे शहराकरिता स्मार्ट सिटी प्लॅनचा एक भाग म्हणून औंध-बाणेर-बालेवाडी परिसरात रस्त्यांचे पुनर्रचना प्रकल्प प्रस्तावित केले गेले आहेत. या प्रकल्पांतर्गत तब्बल ३०० कोटी रुपये खर्च करून ४२ किलोमीटर लांबीचे स्मार्ट स्ट्रीट करण्यात आले आहे. यातील मिटकॉनरस्त्यांचे उद्घाटन मुख्यमंत्री करणार आहेत.याशिवाय प्लेसमेकिंग साइट अंतर्गत वापरात नसलेल्या भूखंडाचा कायापालट करण्याचे काम स्मार्ट सिटी करणार आहे. यामध्ये सायन्स पार्क आणि बुकझानिया या दोन प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात येणार आहे.स्मार्ट स्कूल प्रकल्पात जागतिक दर्जाचे राहणीमानाच्या मानदंडाप्रमाणे शहरामध्ये स्मार्ट स्कूल सुरू करण्यात येणार आहे. या सर्व प्रकल्पांचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यातयेणार असल्याचे टिळक यांनी सांगितले.पहिल्या टप्प्यात १५० इलेक्ट्रिक बस खरेदी करणार१ याबाबत महापौर टिळक यांनी सांगितले की, शहरामध्ये स्मार्ट सिटी अंतर्गत टप्प्या-टप्प्याने ५०० इलेक्ट्रिक बस भाडेतत्त्वावर घेण्यात येणार आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यात १५० इलेक्ट्रिक बस खरेदी करण्यात येणार असून, याचा लोकार्पण शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.२ स्मार्ट सिटी आॅपरेशन्स सेंटर ‘एससीओसी’ हे एक उच्च दर्जाचे कमांड अँड कंट्रोल सेंटर आहे, जे शहरातील विविध कामकाजांची देखरेख व व्यवस्थापन करण्यासाठी सध्याचे स्मार्ट इलेमेंट्स आणि भविष्यातील आयटी इन्फ्रास्ट्रक्चर पुण्यातील विकसित स्मार्ट इन्फ्रास्ट्रक्चरला संलग्न करण्याची क्षमता यामध्ये आहे.३ ‘आॅफिस राइड’च्या माध्यमातून शेअरिंगमध्ये प्रवास करण्यासाठीचेअॅप- सामायिक दळणवळणाचा म्हणजेच शेअर्ड मोबिलिटीचा वापर करण्यास प्रोत्साहित करून वाहतूककोंडी आणि प्रदूषण कमी करण्यात येणार आहे.
शनिवारी मुख्यमंत्री पुण्यात : निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विकासकामांच्या उद्घाटनाचा धडाका
By ऑनलाइन लोकमत | Published: February 08, 2019 1:48 AM