शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांच्या विरोधात निवडणूक लढविली, तोच उमेदवार शिंदे गटात जाणार; लता शिंदेंच्या उपस्थितीत घोषणा
2
IND vs AUS: पर्थवर इतिहास रचण्यात टीम इंडिया 'यशस्वी'! ऑस्ट्रेलियाच्या बालेकिल्ल्यात 'विराट' विजय
3
Maharashtra Assembly Election Result 2024: देवेंद्र फडणवीस होणार राज्याचे मुख्यमंत्री?; आजच शिक्कामोर्तब होण्याची शक्यता
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: ही काय भानगड! ९५ मतदारसंघात मतांमध्ये तफावत; मतदान अन् EVM ची मते कुठे जुळली नाहीत?
5
५० खोके एकदम ओके...राज्यात गाजलेली घोषणा पहिल्यांदा देणारा आमदारही निवडणुकीत पराभूत
6
"...तर याचा करेक्ट कार्यक्रम वाजला असता"; रोहित पवारांच्या 'त्या' विधानावर अमोल मिटकरी भडकले
7
बँक खातेदारांना आता ४ नॉमिनी व्यक्तींची नावं द्यावी लागणार, सरकार लवकरच कायदा आणणार!
8
NTPC चा शेअर तुम्हाला अलॉट झालाय का? कसं चेक कराल, पाहा स्टेप-बाय-स्टेप प्रोसिजर
9
'कांतारा'च्या कलाकारांसोबत मोठी दुर्घटना! शूटिंगवरुन परतताना बस पलटी, अनेक जण जखमी
10
Sambhal Violence : संभलमध्ये हिंसाचार भडकावल्याप्रकरणी सपा खासदार आणि आमदाराच्या मुलावर गुन्हा दाखल, पोलिसांकडून अनेक ठिकाणी  छापेमारी
11
"ज्यांना जनतेने ८० वेळा नाकारलं, ते रोखताहेत संसदेचं कामकाज’’, पंतप्रधान मोदींची टीका   
12
'हास्यजत्रा' फेम प्रियदर्शनी इंदलकरचं अनेक वर्षांपासूनचं स्वप्न झालं पूर्ण! अभिनेत्री म्हणाली- "लंडनमध्ये जाऊन..."
13
"नियोजित कट होता, त्यात माझा बळी गेला"; अजित पवारांवर राम शिंदेंचा गंभीर आरोप
14
४ जणांचा मृत्यू , २० हून अधिक पोलीस जखमी… संभलमध्ये बाहेरच्या लोकांना प्रवेश नाही; काय आहे प्रकरण?
15
कोण किशोर कुमार? आलियाने पहिल्याच भेटीत विचारलेला प्रश्न; रणबीर कपूरचा खुलासा
16
नाना पटोलेंनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याची चर्चा; काँग्रेसकडून वृत्ताचे खंडन
17
थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर...; प्रीतीसंगमावर अजित पवार-रोहित पवारांची भेट!
18
Raj Thackeray MNS: राज ठाकरे यांचे इंजिन धोक्यात, पक्षाची मान्यता जाणार का?
19
RIL share price: रिलायन्स इंडस्ट्रीजवर ब्रोकरेज बुलिश, रिस्क रिवॉर्ड अनुकूल; दिला खरेदीचा सल्ला
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अनेक नेत्यांचे राजकीय अस्तित्व धोक्यात; कुणी कमावलं तर कुणी काय गमावलं? जाणून घ्या

खास सभा तहकूब, शिवसृष्टीचा निर्णय मुख्यमंत्री घेणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 04, 2017 7:00 AM

शहरातील प्रस्तावित शिवसृष्टीबाबतचा निर्णय आता मुख्यमंत्री स्तरावर होणार आहे. महापौर मुक्ता टिळक यांनी तसे स्पष्ट करीत या विषयासाठी बोलावलेली खास सभा मंगळवारी तहकूब केली.

पुणे : शहरातील प्रस्तावित शिवसृष्टीबाबतचा निर्णय आता मुख्यमंत्री स्तरावर होणार आहे. महापौर मुक्ता टिळक यांनी तसे स्पष्ट करीत या विषयासाठी बोलावलेली खास सभा मंगळवारी तहकूब केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत सर्व संबधितांची संयुक्त बैठक घेऊन त्यात याबाबत सर्वसंमतीने निर्णय घेण्यात येईल, असे त्यांनी सभागृहात सांगितले.कोथरूड येथे मेट्रो स्थानकासाठीच्या जागेवर शिवसृष्टी तयार करण्याची मागणी शहरात जोर धरत आहे. माजी उपमहापौर दीपक मानकर यांनी यामागे शिवप्रेमी संघटनांचा पाठिंबा उभा केला आहे. महापालिकेच्या त्यासाठी आतापर्यंत दोन खास सभा झाल्या. त्यात या विषयावर बरीच चर्चा झाली व नियोजित शिवसृष्टीला सर्वपक्षीय पाठिंबा व्यक्त करण्यात आला. पालकमंत्री गिरीश बापट यांनी याची दखल घेत मुंबईत मेट्रोचे अधिकारी व महापालिका पदाधिकारी यांची खास बैठक घडवून आणली. या बैठकीत मेट्रो साठीच्या २८ एकर जागेवर काही भागात स्थानक तसेच काही भागात शिवसृष्टी असे करणे शक्य आहे, याची तंत्रज्ञांमार्फत चाचपणी करण्याचे ठरले आहे. तसेच मेट्रोचे वरिष्ठ अधिकारी, काही तंत्रज्ञ व महापालिका पदाधिकारी अशी संयुक्त बैठक लवकरच आयोजित करण्याचा निर्णयही त्यावेळी झाला.मात्र दरम्यानच्या काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस परदेश दौºयावर असल्याने अशी बैठक झालीच नाही. मेट्रोचे काम सुरू झाले आहे. त्याला गतीही दिली जात आहे, शिवसृष्टीचा निर्णय मात्र व्हायला तयार नाही. त्यामुळे सत्ताधारी भाजपाने मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून याबाबत जास्तीत जास्त लवकर बैठक घडवून आणावी, अशी मागणी सभेत मानकर यांनी केली. सर्वपक्षीय पाठिंबा मिळालेला असताना शिवसृष्टीच्या निर्णयाला वेळ का लावला जात आहे, अशा विचारणा विरोधी पक्षनेते चेतन तुपे यांनी केली. मुख्यमंत्र्यांसमवेतच्या नियोजित बैठकीला राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्याबरोबरच सर्व पक्षांच्या नेत्यांना बोलावण्यात यावे, अशी सूचना त्यांनी केली. अश्विनी कदम यांनी याबाबत नक्की काय झाले आहे, याची माहिती सभागृहाला द्यावी, अशी मागणी केली. त्यावर महापौर टिळक यांनी मुख्यमंत्र्यांबरोबर बोलून येत्या महिनाभरात यासंबधीचा निर्णय घेतला जाईल. तोपर्यंत सभा तहकूब करत असल्याचे जाहीर केले.

टॅग्स :PuneपुणेBJPभाजपाPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस