शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
6
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
7
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
8
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
9
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
10
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
11
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
12
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
13
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
14
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
15
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
16
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
17
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
18
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
19
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
20
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."

साहित्य रंगभूमी प्रतिष्ठानचे प्रमुख विश्वस्त अशोक कुलकर्णी यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 05, 2021 4:19 AM

पुणे : साहित्य रंगभूमी प्रतिष्ठानचे प्रमुख विश्वस्त अशोक कुलकर्णी (वय ८४) यांचे मंगळवारी निधन झाले. देशभरातल्या सर्वभाषिक प्रायोगिक नाटक ...

पुणे : साहित्य रंगभूमी प्रतिष्ठानचे प्रमुख विश्वस्त अशोक कुलकर्णी (वय ८४) यांचे मंगळवारी निधन झाले. देशभरातल्या सर्वभाषिक प्रायोगिक नाटक मंडळीमध्ये ते ‘अशोककाका’ म्हणून परिचित होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, मुलगा, सून व नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्यावर पोटाची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतर प्रकृतीची गुंतागुत वाढत गेली. त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथेच त्यांची प्राणज्योत मालवली.

अशोक कुलकर्णी यांचा जन्म बेळगाव इथे झाला. त्यांचे शालेय व महाविद्यालयीन शिक्षण जन्मगावीच झाले. त्यांनी ‘इंडियन डेमोग्राफिक रिसर्च इन्स्टि़ट्यूट , फायनान्शियल एक्स्प्रेस’ अशा अनेक संस्थांमध्ये महत्त्वाच्या पदावर काम केले. या काळात त्यांच्या मुंबईतील वास्तव्यात त्यांची तत्कालीन प्रयोगशील नाटक आणि सिनेमा करणाऱ्या अनेक कलावंतांशी मैत्री झाली. वालचंद इंडस्ट्रीजमध्ये महत्त्वाच्या पदावर काम करून ते निवृत्त झाले. निवृत्तीनंतरचा काळ हा त्यांनी नाटकाच्या क्षेत्रात व्यतीत करायचे ठरवले. पडद्यामागे उभे राहून त्यांनी गेल्या वीस वर्षांत अतिशय मोलाची कामगिरी निभावली. परफॉरमिंग आर्ट या क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या तरुण रंगकर्मींचा सन्मान करणारी विनोद दोषी फेलोशिप त्यांनी सुरू केली. पुढे तेंडुलकर दुबे फेलोशिप आणि मधू गानू फेलोशिप या नावाने फेलोशिप दिल्या. आजवर ७२ जणांना या फेलोशिपने सन्मानित करण्यात आले आहे.

त्यांनी २००८ ते २०२० सलग बारा वर्षे विनोद दोशी नाट्य महोत्सव तथा सारंग नाट्य महोत्सवाचे आयोजन करून पुणे शहराच्या लौकिकात मोलाची भर घातली. साहित्य रंगभूमी प्रतिष्ठानच्यावतीने रंगभूमीच्या इतिहासाचा मागोवा घेणारे ‘सीन्स वी मेड’, तेंडुलकरांच्या लेखन -नाट्य- चित्रपट कारकिर्दीवर अनेक मान्यवरांनी लिहिलेले ‘अजून तेंडुलकर’ अशी अनेक पुस्तके प्रकाशित केली. त्यातल्या ‘प्रायोगिक रंगभूमी- तीन अंक’ या पुस्तकाला नुकताच साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला होता. नाटककारांची प्रयोगशाळा असा ‘रंगभान’ नावाचा दीड वर्षे चालणारा उप्रकम त्यांनी चालवला. त्यांच्या निधनाने कलाक्षेत्राची फार मोठी हानी झाली आहे.