शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

पाबळ रस्त्यालगत वसाहतीमध्ये चिकुनगुनियासदृश आजार

By admin | Published: June 28, 2017 3:56 AM

पाबळ रोडलगत इंद्रायणी सोसायटी व परिसरात चिकुन गुनियासदृश विषाणूजन्य तापाची साथ पसरली आहे. जवळपास

लोकमत न्यूज नेटवर्कसोेमेश्वरनगर : वयाच्या तेराव्या वर्षीपासून राजश्रीने ध्यास घेतला तो विठ्ठलाचा. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीमध्ये आळंदी ते पंढरपूर अशा २५० किलोमीटर रस्त्यावर रांगोळीच्या पायघड्या घालण्याची तिची अविरत सेवा सुरू आहे. राजश्रीच्या या सेवेमुळे दररोज रांगोळीच्या पायघड्यांनी माऊलींची पंढरीची वाट सजत आहे. राजश्री राजेंद्र जुन्नरकर असे या १९ वर्षीय मुलीचे नाव आहे. वडील राजेंद्र हे फर्निचरचे काम करतात, तर आई मनीषा ही गृहिणी आहे. तिला एक भाऊ तर एक बहीणही आहे. जुन्नरकर कुटुंब मूळचे जुन्नर तालुक्यातील हिवरे गावचे असून व्यवसायानिमित्त वडील भोसरीमध्ये स्थायिक झाले. तिला लहानपणापासूनच वेगवेगळी चित्रे काढण्याची आवड होती. तिची ही आवड तिच्या आईवडिलांनी ओळखली आणि तिला रांगोळी आणि मेहंदी काढण्यासाठी प्रोत्साहन दिले. वडील तिला वेगवेगळ्या ठिकाणी स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी नेत होते. वयाच्या तेराव्या वर्षी तिने ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीमध्ये आळंदी ते पंढरपूर अशा रस्त्यावर रांगोळी काढण्यास सुरुवात केली. पहिल्या वर्षी तिला रांगोळीसाठी आर्थिक चणचण जाणवली. या २५० किलोमीटर रस्त्यावर रांगोळी काढण्यासाठी १० पोती कलर तर ८० पोती रांगोळी लागत होती. एवढ्या मोठ्या प्रमाणावर खर्च जुन्नरकर कुटुंबीयांना परवडणारा नव्हता. पण म्हणतात ना इच्छा तिथे मार्ग. याप्रमाणे तिची कला पाहून अनेकांनी तिला रांगोळीच्या स्वरूपात मदत करण्यास सुरुवात केली. यामध्ये सातारचे खासदार उदयनराजे भोसले, आमदार महेश लांडगे, संजय वाबळे, संजय गायकवाड, वैकुंठ कुंभार, खासदार धनंजय महाडिक, सचिन लांडगे, शाम गवळी, अजित गव्हाणे यांनी तिचा रांगोळीचा खर्च उचलला. दरवर्षी तिला ही मदत मिळते. त्यामुळे गेल्या सहा वर्षांपासून राजश्रीचे सर्व रस्त्याने रांगोळीच्या पायघड्या घालण्याचे व्रत आजही सुरू आहे आणि ते शेवटपर्यंत अखंडरीत्या सुरू ठेवणार असल्याचे राजश्री सांगते.