एका दिवसात गावात सरासरी रोज ५ ते १० रुग्ण आढळून येत असून, आत्तापर्यंत अनेकांना याची बाधा झाली आहे. या आजाराला सामोरे जाण्यासाठी रुग्णांना खासगी दवाखान्याचा रस्ता धरण्याची वेळ आली असून, दवाखान्याचा न परवडणारा खर्च सोसावा लागत आहे. एका रुग्णास सरासरी तीन दिवसांच्या सलाईनसह उपचारासाठी तीन ते चार हजार रुपये खर्च येत आहे.
याबबात डॉ. सातपुते यांनी सांगितले की, आरोग्य विभागाकडून काही घरामध्ये तपासणी करण्यात आली, त्यावेळी नागरिकांच्या घरामध्येच अळ्यांची पैदास होत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे घराघरात रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे नागरिकांनी घरातील पाणीसाठे तपासून ते कोरडे केले पाहिजेत, ते होत नाही. संपूर्ण महाराष्ट्राला डेंग्यूचा विळखा आहे. एक डास ३-४ किलोमीटर जाऊन बाधा पोहोचू शकतो. त्यासाठी आठवड्यातून एकदिवस कोरडा दिवस पाळण्याची गरज आहे. नागरिकांनी तुंबलेली गटारे मोकळी करून द्यावीत. डबडी, फुटक्या बादल्या, टायर यांमधील साचलेले पाणी मोकळे करावे.