शहरं
Join us  
Trending Stories
1
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
2
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
3
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
4
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
5
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
6
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
7
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
8
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
9
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
10
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
11
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
12
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
13
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
14
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
15
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
16
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
17
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
18
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
19
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
20
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला

रेल्वे स्थानाकातून बालिकेचे अपहरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2018 3:29 AM

पाच वर्षांची मुलगी : पोलिसात गुन्हा दाखल

पुणे : पुणे रेल्वेस्थानकाच्या आवारातून पाच वर्षांची मुलगी बेपत्ता झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी लोहमार्ग पोलिसांकडून अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.जयश्री जयसिंग चव्हाण (वय ५) असे बेपत्ता झालेल्या बालिकेचे नाव आहे. ही मुलगी ज्या ठिकाणाहून बेपत्ता झाली होती, त्याच ठिकाणाहून ६ फेबु्रवारी २०१८ रोजी एका ८ वर्षांच्या मुलीला एका महिलेने तिच्या पालकांशी गोड बोलून पळवून नेले होते़याबाबत पोलिसांनी सांगितले, की जयसिंग चव्हाण मजुरी करतात. ते मूळचे नागपूरमधील उमरेड येथील राहणारे आहेत़ अगोदर चुकून ते कुर्डुवाडीला गेले होते़ तेथून ते सोमवारी पुण्यात मजुरीसाठी आले आहेत. सोमवारी रात्री साडेआठच्या सुमारास चव्हाण दाम्पत्य आणि त्यांची दोन मुले पुणे रेल्वेस्थानकाच्या आवारात दर्ग्यानजीक थांबले होते. तेथेच त्यांनी आंघोळ केली़ त्यावेळी त्यांची मुलगी जयश्री तेथे खेळत होती. काही वेळानंतर जयश्री तेथून बेपत्ता झाली.रेल्वे पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे़ पोलिसांकडून मुलीचा शोध घेण्यात येत आहे. रेल्वे स्थानक परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण तपासण्यात आले़ त्यात ही मुलगी आंघोळ करताना दिसते़ परंतु, त्यानंतर खेळत असल्याचे दिसत नाही़ अन्य सीसीटीव्हीमध्ये ती आढळून आलेली नाही, असे लोहमार्ग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मनोज खंडाळे यांनी दिली.जयश्री चव्हाण हिने हिरव्या रंगाचा कुर्ता, तसेच पिवळ्या रंगाची सलवार असा पोषाख परिधान केला आहे. तिची उंची तीन फूट असून वर्ण सावळा आहे.सुटीमुळे रेल्वेस्थानकात खूप गर्दी असल्याने ती नेमकी कोठे गेली, हे समजू शकले नाही़ चव्हाण दाम्पत्याने तिचा रेल्वेस्थानक, एसटी स्थानक आणि ससून रुग्णालयाच्या परिसरात शोध घेतला. मात्र, ती सापडली नाही. घाबरलेल्या चव्हाण यांनी पुणे रेल्वे स्थानक लोहमार्ग पोलीस ठाण्यात मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार रात्री उशिरा दाखल केली.

टॅग्स :KidnappingअपहरणPuneपुणे