पिंपरे (खुर्द) येथील रेल्वे गेट शेजारील माळवस्ती येथे एक घिसाडी समाजातील कुटुंब वास्तव्यास आले होते. त्यांच्या १५ ते १६ वर्षीय मुलीचा विवाह सोहळा शुक्रवारी (दि. १७) आयोजित करण्यात आला होता. नीरा पोलिसांना या विवाहाची माहिती समजली. त्याच बरोबर यातील मुलगी अल्पवयीन असल्याचे त्यांना सांगण्यात आल्याने पोलीस उपनिरीक्षक कैलास गोतपागर, हवालदार राजेंद्र भापकर, नीलेश जाधव व त्यांची टीम दुपारी या ठिकाणी पोहचली. त्या लोकांना विवाहासाठी ब्राम्हण मिळाला नसल्याने विवाह लांबला होता. पोलिसांचे पथक तिथे पोहचल्यावर काही लोक पाळून गेले. तर काही लोक तिथेच थांबले. गोतपागर यांनी विवाहासाठी आलेल्या लोकांना एकत्र बोलवले त्यांना बलाविवाहविषयक असलेले कायदे समजून सांगितला. त्याच बरोबर बालविवाहामुळे मुलीच्या शरीरावर होणारे दुष्परिणामही सांगितले यातून या लोकांचे प्रबोधन झाले आणि त्यांनी विवाह करण्याचा निर्णय रद्द केला. त्याच बरोबर पुन्हा अश्याप्रकारे बालविवाह करणार नाही, असे सांगितले.
कोट
अल्पवयीन मुलांचे लग्न लावणे हा गुन्हा आहे. सर्वोच्च न्यायलयाच्या निर्देशानुसार अशा प्रकरणात बाल लैंगिक अत्याचार अन्वये गुन्हे दाखल होऊ शकतात. असे बालविवाह रोखणे हे समाजाचे ही कर्तव्य आहे. आपल्या गावात असे बालविवाह होत असतील तर लोकांनी प्रशासनाला व पोलिसांना वेळीच कळवावे. त्या कुटुंबांचे समुपदेशन केले जाईल.
-कैलास गोतपागर, पोलीस उपनिरीक्षक नीरा पोलीस दूरक्षेत्र.
फोटो : पिंपळ (खुर्द) येथील.बालविवाहासाठी जमलेले वऱ्हाडी.