शहरं
Join us  
Trending Stories
1
सारे अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात, मुकेश अंबानींनी तर अमेरिकेतच पैसा ओतला... मोठी डील...
2
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
3
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
4
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
5
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
6
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
7
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
8
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
9
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
10
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
11
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
12
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
13
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
14
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
15
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”
16
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
17
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा
18
SA vs SL Test : श्रीलंकेचा संघ ४२ धावांत All Out! ६४ ओव्हर्समध्ये पडल्या २० विकेट्स
19
'ये है मोहोब्बते' फेम अभिनेत्याचा झाला साखरपुडा, होणाऱ्या बायकोसाठी लिहिली सुंदर पोस्ट
20
“लिहून ठेवा, एक दिवस उद्धव ठाकरे कुटुंबाला घेऊन देश सोडून निघून जातील”: रामदास कदम

मुले परदेशात आईवडील भारतात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 4:10 AM

राजू इनामदार पुणे : कोरोना संसर्गाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर परदेशात असणारी तरुण मुले व भारतातील त्यांचे आईवडील दोघेही काळजीत पडले ...

राजू इनामदार

पुणे : कोरोना संसर्गाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर परदेशात असणारी तरुण मुले व भारतातील त्यांचे आईवडील दोघेही काळजीत पडले आहेत. तंत्रज्ञानाच्या साह्याने दररोज एकमेकांशी संवाद करत ते परस्परांंना मानसिक बळ देत आहेत.

नागपूरच्या गडमडे कुटुंबातील शिल्पा व सारिका या दोन्ही कन्या हाँगकाँगमध्ये आहेत. थोरली शिल्पा मुळे (लग्नानंतर) ७ वर्षांपासून, तर धाकटी सारिका ३ वर्षांपूर्वी तिकडे गेली. दोघी नोकरी करतात. आई दुर्गा, वडील श्रीराम व भाऊ अतूल नागपुरात आहेत. शिल्पा म्हणाल्या, “भाऊ तिकडे असल्याने चिंता नाही, पण काळजी वाटतेच. कोरोनामुळे सतत त्यांचा विचार मनात असतो. त्यावर उपाय म्हणून आम्ही आता रोज व्हिडीओ कॉल करतोच करतो. प्रत्यक्ष भेट होत नाही, पण अशा संवादाने किमान मनातली सल निघून जायला मदत होते.”

डॉ. शिल्पा पटवर्धन मागील ७ वर्षे जर्मनीत सायकाट्रिस्ट म्हणून काम करतात. सेक्सॉलॉजिस्ट डॉ. लीना मोहाडीकर या त्यांच्या आई. त्या व एक मोठी बहीण पुण्यात असतात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी बहीण राहते त्याच इमारतीत आईला आणले. डॉ. शिल्पा म्हणाल्या, “आई सक्रिय आहे, पण तरी काळजी वाटते. सतत कार्यरत राहा ही आईचीच शिकवण. म्हणूनच आम्ही दोघींनी मिळून कोरोना काळात एक ऑनलाइन ट्रेनिंग प्रोग्रॅमही केला. भौगोलिक अंतरामुळे अगदी सहज जाणे-येणे कोणाला शक्य नसल्याने आम्ही हा उपाय काढला. सासूबाईही धनकवडीला असतात. त्या व आई यांच्याबरोबर आम्ही इथून सतत संवादी राहतो.”

आईवडील भारतात व मुले परदेशात ही एक सामाजिक समस्या झाल्याचे निदान समाज अभ्यासकांनी पूर्वीच केले. कोरोनामुळे ही समस्या अधिकच गडद झाली. मात्र ‘व्हिडीओ कॉलिंग’च्या माध्यमातून भौगोलिक अंतरावर मात करण्याचा प्रयत्न ही मंडळी करत आहेत.

कोट

“दोन्ही मुलींनी तिकडे जातानाच आम्हाला सगळे नीट समजावून सांगितले होते. मी निवृत्त न्यायाधीश आहे. कोरोनामुळे व्यथीत व्हायला होते, पण आम्ही आमची पूर्ण काळजी घेऊन समाधानी राहतो.”

-श्रीराम व दुर्गा गडमडे, नागपूर

कोट

“तिची व माझीही मानसिकता आधीच तयार होती. लांब तर लांब, मुलगी आनंदी तर मीही आनंदी अशीच माझी भावना आहे. कोरोना सगळ्या जगात आहे. सगळे जग त्याचा सामना करते आहे. धीर धरून सगळ्या नियमांचे पालन करणे हा यावरचा उपाय आहे, काळजी करणे हा नाही. काळजी वाटतच राहते, त्यावर मात करायला शिकले पाहिजे.”

-डॉ. लीना मोहाडीकर, पुणे

चौकट

संस्था काय करतात?

“फक्त फ्रँकफर्टमध्येच काही हजार मराठी लोक आहेत. कोणी भारतात जाणारे असले की आम्ही त्याच्या गावाच्या आसपास कोणाकोणाचे आईवडील राहतात ते पाहतो व जाणाऱ्या व्यक्तीला त्यांची भेट घेऊन विचारपूस करायला सांगतो. जीवन करपे हा आमचा मित्र असे कायम करतो. यातून प्रत्यक्ष मुलगा किंवा मुलगी यांची भेट झाली नाही तरी त्याच्याबरोबर असणारे कोणीतरी भेटले याचे समाधान मोठे असते. कोरोनामुळे इथल्या बहुतेक तरुण मुलांची मानसिक अवस्था थोडी नाजूक झाली आहे.”

-अजित रानडे, संस्थापक, देसी जर्मन्स, मराठी कट्टा, जर्मनी.