पुणे : वेगवेगळ्या आकाराच्या रिकाम्या प्लॅस्टिकचा बाटल्या, त्यात वेगवेगळ्या प्रकाराची धान्य. इतक्या थोडक्या साहित्यात मुलांनी तब्बल ४० वाद्ये तयार केली व ती वाजवण्याचा आनंदही लुटला. बालरंजन केंद्रातील या उपक्रमाने मुले हरखून गेली व हाताशी असेल त्याचा वापर करून आनंद कसा घेता येतो हेही शिकली.शुभा मराठे यांनी सुरवातीला मुलांना कल्पना समजावून सांगितली. त्याप्रमाणे त्यांना साहित्य देण्यात आले. त्याचबरोबर आफ्रिकन ढोलही त्यांना देण्यात आला. मुलांचे पाच गट तयार करण्यात आले. प्रत्येक गटासाठी एक गाणे होते. त्या गाण्याला आवश्यक असणारे आवाज ड्रममधून कसे काढायचे याची माहिती मराठे यांनी मुलांना दिले. त्याप्रमाणे मुलांनी ड्रम धरून तो वाजवला व पावसाचे तसेच अन्य आवाज कसे काढायचे याचे प्रशिक्षण त्यांनी मुलांना दिले.वाद्य वादनाने मुलांच्या मनातील नकारात्मक भावनांना वाट मिळते. त्यांच्या मनावरील तणाव दूर होतात. तणाव व्यवस्थापनासाठीही म्हणूनही असे उपक्रम घेतले जातात अशी माहिती यावेळी बालरंजन केंद्राच्या संस्थापिका माधुरी सहस्त्रबुद्धे यांनी दिली. माधवी केसकर यांनी मराठे यांचा परिचय करून दिला. लता दामले यांनी आभार मानले. रेणू गावस्कर, सुषमा दातार, संगीता देशपांडे, इंद्रायणी गावस्कर आदी यावेळी उपस्थित होते.
मुलांनी घेतला आफ्रिकन ढोलवादनाचा आनंद; बालरंजन केंद्रात अनोखा उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 03, 2018 1:59 PM
वेगवेगळ्या आकाराच्या रिकाम्या प्लॅस्टिकचा बाटल्या, त्यात वेगवेगळ्या प्रकाराची धान्य. इतक्या थोडक्या साहित्यात मुलांनी तब्बल ४० वाद्ये तयार केली व ती वाजवण्याचा आनंदही लुटला.
ठळक मुद्देबालरंजन केंद्रातील या उपक्रमाने मुले गेली हरखूनमुलांचे तयार करण्यात आले पाच गट, प्रत्येक गटासाठी होते एक गाणे