शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

चिमुरड्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिली पत्रे !

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2020 2:04 PM

कोरोनाचा उद्रेक आणि त्यामुळे निर्माण झालेली परिस्थिती याचे गांभीर्य लहान मुलांनाही समजत आहे.

ठळक मुद्देविद्योदय मुक्तांगण परिवाराचा पुढाकार : स्वच्छतेचे नियम पाळण्याचे दिले आश्वासन

प्रज्ञा केळकर-सिंगपुणे : आपला देश मोठ्या संकटात सापडला आहे, असे आई-बाबा सांगत आहेत. बातम्यांमधूनही आम्हाला दररोज कोरोनाबद्दलची माहिती मिळते. सर्व डॉक्टर, पोलीस, सफाई कर्मचारी आमच्यासाठी झटत आहेत. घरीच थांबण्याचे आपली आणि कुटुंबाची काळजी घेण्याचे आवाहनही तुम्ही करत आहात. आम्ही लहान असलो तरी बाहेर जाण्याचा हट्ट करणार नाही. आई-बाबांचे आणि तुमचे ऐकू, तुम्ही सुरू केलेल्या स्वच्छता अभियानाचे काटेकोर पालन करू. मोठेपणी शास्त्रज्ञ होऊन भविष्यात देशाला अशा संकटातून बाहेर काढण्यासाठी सज्ज राहू, असे आश्वासन चिमुरड्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिले आहे. विद्योदय मुक्तांगण परिवाराच्या माध्यमातून पत्रे लिहिण्यात आली असून, ती पंतप्रधान कार्यालयाला पाठविली जाणार आहेत. कोरोनामुळे यंदा शाळा लवकर बंद करण्यात आल्या. लॉकडाऊनमुळे सध्या घरातून बाहेर पडणेही शक्य नाही. सुटीतील मोकळ्या वेळेचा सदुपयोग व्हावा, यासाठी विद्योदयचे विनायक माळी आणि सार्शा माळी यांनी ऑनलाईन सेशनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांकडून विज्ञानाचे धडे गिरवून घेण्यास सुरुवात केली आहे. पुणे, कोल्हापूर, रत्नागिरी, सांगली अशा विविध भागांमधून विद्यार्थी या उपक्रमाशी जोडले गेले आहेत. शास्त्राशी संबंधित प्रयोग, गमतीजमती, विविध विषयांवर चर्चा असे या सेशनचे स्वरुप आहे. यात कोरोनाचीही चर्चा झाली. यातूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहावे, अशी कल्पना मुलांना सुचल्याचे विनायक माळी यांनी ' लोकमत' ला सांगितले. कोरोनाचा उद्रेक आणि त्यामुळे निर्माण झालेली परिस्थिती याचे गांभीर्य लहान मुलांनाही समजत आहे. मुले पालकांबरोबर टीव्ही पाहत असतात. पंतप्रधान देशाला काय आवाहन करतात, याचीही त्यांना कल्पना आहे. त्यामुळेच आम्ही तुमच्याबरोबर आहोत हे सांगण्यासाठी आणि आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी मुलांनी पंतप्रधानांना पत्र लिहिले आहे. ऑ नलाईन सेशनचाही मुले मनापासून आनंद लुटत आहेत, असे विनायक माळी म्हणाले.................छोट्यांना कळतं, तर...पत्रात पुण्यातील साई वाईकर म्हणते, की मोदीजी, तुम्ही सध्या ज्या उपाययोजना करीत आहात, त्यामुळे देशाचाच फायदा होणार आहे. बऱ्याच लोकांना अजून विषाणूचे गांभीर्य कळालेले नाही. आम्ही लहान मुले ऐकू शकतो तर मोठी माणसे का ऐकत नाहीत, असा प्रश्न पडतो. आपल्या देशाची भावी सुसंस्कृत नागरिक म्हणून मी तरी तुमच्या सर्व सूचनांचे पालन करेन आणि घरातच राहीन.....................

आम्ही राहू घरातचरुची शेटे म्हणते, ‘आपले पोलीस रात्रंदिवस रस्त्यांवर पहारा देत आहेत आणि डॉक्टर रुग्णांची सेवा करण्यात गुंतलेले आहेत. मोठ्यांचे माहीत नाही; मात्र आम्ही सर्व लहान मुले तुमच्याबरोबर आहोत. तुम्ही सांगेपर्यंत आम्ही घरातच खेळू, घराच्या बाहेर जाणार नाही आणि अडचणी वाढवणार नाही................................

स्वच्छता पाळणारनिषाद पाटसकरने लिहिले आहे, की मी स्वच्छतेचे सर्व नियम पाळतो. आपले घर, परिसर स्वच्छ ठेवणे ही आपली जबाबदारी आहे, असे बाबांनी आणि आजोबांनी मला सांगितले आहे. मोठेपणी मला शास्त्रज्ञ होऊन देशसेवा करायची आहे.

टॅग्स :Puneपुणेkolhapurकोल्हापूरRatnagiriरत्नागिरीSangliसांगलीStudentविद्यार्थीNarendra Modiनरेंद्र मोदीCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस