चासकमान : कङूस (ता.खेड) येथील डायनँमिक इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी आगळी वेगळी फटाके मुक्त दिवाळी साजरी करण्याची शपथ घेतली. तसेच दिपावलीच्या निमित्ताने अत्यंत सुंदर कलाकुसरीने आपल्या अंगी असलेल्या नाविण्य पुर्ण कल्पकतेतून इकोफ्रेंन्डली आकाश कंदील,मातीच्या पनत्या,बनविण्याचा उपक्रम हाती घेत साकारत चिमुकल्या विद्याथीर्नी आदर्श निर्माण केला.शालेय विद्याथीर्नी बदलत्या आधुनिक युगात अनुभव विश्वसंमृद्ध होऊन सकारात्मक विचार ठेवत आईवडीलां बरोबरच शिक्षकांकङून मिळनारी संस्काराची शिदोरी आत्मसात करून विकासाच्या दृष्टीने फटाकडे मुक्त दिवाळी,फटाकड्याचे परिणाम,दुषपरिनाम हा संस्कार बालवया पासून विद्यार्थीच्या मनावर बिंबविण्यासाठी शाळेच्या वतिने प्रयत्न करण्यात आला.व केला जात आहे.पर्यावरण विषयक विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.डायनँनिक शाळेतील विद्यार्थीच्या अंगी असलेल्या सुप्त कलागुनांना वावदेण्यासाठी शाळेच्या व्यवस्थापिका जयश्री गारगोटे. यांच्या संकल्पपनेतून एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. शालेय विद्यार्थींना शाळेच्या वतिने साहित्य पुरविण्यात आले होते. तयार केलेल्या सर्व आकाश कंदीलांचे प्रदर्शन मांडण्यात येणार असून उत्कृष्ट ठरलेल्या आकाश कंदील विजेत्या विद्याथीर्नां बक्षीस देण्यात येणार आहे. यावेळी प्राचार्य शिवाजी गुंजाळ, अध्यक्ष प्रताप गारगोटे, सचिव पंडित मोढवे, उपाध्यक्ष निलेश नेहेरे, संचालक प्रल्हाद गारगोटे, कैलास शेळके, विलास गारगोटे, संजय गारगोटे उपस्थित होते.शालेय विद्यार्थींनी फटाकडे मुक्त दिवाळी साजरी करण्याची शपत घेऊन फटाकड्या पासून होनारे प्रदुषण, फटाकड्या पासून मानवी आरोग्या बरोबरच पशुपक्षांच्या जिवितास असणारा धोका व होणारे दुष्परिणाम इत्यादी विषयी गावात जनजागृती केली. ८५० विद्यार्थ्यांनीइकोफ्रेंन्डली सुबक, रेखीव कागदाचे रंगीत आकाश कंदील बनविले.
मुलांची फटाकेमुक्त दिवाळीची शपथ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2018 12:32 AM