घरात जवळजवळ कोणत्याही खोलीसाठी योग्य रंग असणे महत्त्वाचे आहे, परंतु आपल्या मुलाच्या खोलीची सजावट करताना हे विशेषतः महत्त्वाचे आहे. आपण हे सुनिश्चित केले पाहिजे की रंगसंगती सुरक्षित, आरामदायक आहे आणि आपल्या मुलासाठी खूप तेजस्वी किंवा जास्त गडद नाही. लहान मुलांच्या खोलीत लॉफ्ट बेड करताना उत्तम जागा शोधणे आवश्यक आहे. हे करताना खोलीचे सौंदर्य न बिघडवता तज्ज्ञांच्या सल्ल्याने हे करणे आवश्यक आहे. भिंतीतील लॉफ्टमुळे अधिक स्टोरेज मिळते आणि स्टडी टेबल किंवा प्ले एरियासाठी वापरातील भागात अधिक जागा मिळते. लहान मुलांच्या भिंतीवर वेव्ह प्रकारातील रंगसंगती, त्यावर चान्स म्युरल लावणे यामुळे ते अधिक आकर्षक दिसते. पेस्टल पेंट रंगांचा वापर २०२२ मध्ये एक लोकप्रिय ट्रेंड होऊ लागला आहे. पेस्टल वॉलपेंटमुळे मुलांची कल्पनाशक्ती आणि कार्यशक्ती खुलवण्यात अधिक मदत होते. मुलांची खोली म्हणजे एक बेडरूम, अभ्यास आणि प्लेरूम असते. इंटीरियर डिझाईन प्रोजेक्टमध्ये, खोलीच्या प्रत्येक भागाची-झोनची व्यवस्था कशी करावी हे पहिली गोष्ट आहे. मग डिझाइन शैली, साहित्य, फर्निचर, सजावट आणि प्रकाशयोजना निवडली जाते. डेस्क आणि बुक्ससाठी जागा ही साधारणपणे खिडकीच्या पुढे असल्यास जास्त चांगली. नैसर्गिक प्रकाश आणि बाहेरील दिसणारे नैसर्गिक सौंदर्य आणि झाडे भावनिक ताण दूर करतात.
खेळण्याचे क्षेत्र मनोरंजन आणि छंदांसाठीसुद्धा जागा असणे महत्त्वाचे आहे. प्रशस्त खोल्यांच्या प्रकल्पांमध्ये, खेळाचे क्षेत्र कोपऱ्यात बनवले जाते आणि लहान खोल्यांमध्ये मध्यभागी, थंड, तेजस्वी प्रकाश मोठ्या प्रमाणात डोळ्यांना थकवणारा आणि ताणतणाव देतो, परंतु तो तुम्हाला मानसिक क्रियाकलापांसाठी सेट करतो आणि तुम्हाला एकाग्र होण्यास मदत करतो. खोलीची मुख्य प्रकाशयोजना उबदार असावी. वापरात येणारे फर्निचर हे Eco friendly असावे. मुलांच्या आवडीनुसार रंग संगत निवडणे, मल्टिपर्पज- फोल्डिंग, Modular furniture मुळे जागेचे व्यवस्थापन चांगल्या प्रकारे करता येते.
संपत म्हस्के
सन इंटेरियर्स