शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

मिरची, बटाटा, गाजर महागले

By admin | Published: May 08, 2017 2:59 AM

गुलटेकडी येथील श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील भाजीपाला बाजारात रविवारी आवक कमी झाल्याने बटाटा, ढोबळी मिरची, गाजर व बटाटा

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : गुलटेकडी येथील श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील भाजीपाला बाजारात रविवारी आवक कमी झाल्याने बटाटा, ढोबळी मिरची, गाजर व बटाटा या फळभाज्यांच्या भावात वाढ झाली. तर टोमॅटो व शेवग्याचे भाव उतरले.मागील आठवड्याच्या तुलनेत बाजारात रविवारी शेतमालाची १७० ते १८० ट्रक आवक झाली. बहुतेक भाज्यांची आवक स्थिर राहिल्याने भावात चढउतार झाला नाही. पालेभाज्यांची आवक वाढल्याने भावात घट झाली आहे. हिरवी मिरचीला प्रति दहा किलोमागे ४०० ते ५०० रुपये, बटाटा ७० ते १०० रुपये, टोमॅटो ६० ते १००, शेवगा १२०-१५० तर गाजराला २२०-२६० रुपये भाव मिळाला. कोथिंबिरीची सुमारे अडीच लाख जुड्या तर मेथीची सव्वा लाख जुडींची आवक झाली. बाजारात गौरी जातीच्या कोथिंबीरीची सुमारे ५० ते ६० हजार जुड्यांची आवक झाली. कोथिंबीरची ५०० ते ८०० रुपये तर मेथीची ४०० ते ६०० रुपये भावाने विक्री झाली.फळांना मागणीउकाड्यामुळे हैराण झालेल्या नागरीकांचा ओढा फळांचे सरबत, रसवंतीगृहाकडे असल्याने रसदार फळांना मागणी कायम आहे. आंब्यासह लिंबु, मोसंबी, संत्रा, कलिंगड, खरबुज या फळांना मागणी असल्याने भाव टिकून राहिले.सजावटीच्या फुलांना मागणी लग्नसराईमुळे सजावटीच्या फुलांना मागणी असल्याने मार्केटयार्डातील फुलबाजारात या फुलांच्या भावात वाढ झाली. जर्बेरा, कार्नेशियन, डच गुलाब, ग्लॅडिएटर या फुलांना चांगली मागणी आहे. तर झेंडू, गुलछडी या फुलांचे भाव मागणीअभावी उतरले.डाळींच्या भावातील घट सुरूचलोकमत न्यूज नेटवर्कपुणे : मागील काही दिवसांपासून सुरू असलेली डाळींच्या भावातील घट आठवडाभर सुरूच राहिली. तर मागणी वाढल्याने साखरेचे भाव किंचित वाढले. खाद्यतेल, गुळ, पोहा, नारळ, साबुदाणा व इतर वस्तुंचे भाव स्थिर राहिले.घाऊक बाजारात तुरडाळीसह इतर डाळींच्या भावात सातत्याने घट होत आहे. प्रत्येक आठवड्यात क्टिंटलमागे १०० ते ५०० रुपयांपर्यंत भाव खाली येत आहेत. मागील आठवडाभरातही हे २०० रुपयांनी कमी झाले. साखरेला काही प्रमाणात मागणी वाढल्याने क्विंटलमागे २५ रुपये वाढ झाली. मागणीअभावी खोबरेल तेलाचे भाव १५ किलोमागे १०० रुपयांनी उतरले. उलाढाल कमी झाल्याने गुळाचे भाव स्थिर राहिले. हरभरा डाळीच्या भावात घट झाल्याने बेसनाचे भाव ५० किलोमागे १०० ते १५० रुपयांनी उतरले. तर भाजक्या डाळीच्या भावातही ४० किलोमागे ६० ते ७० रुपयांची घट झाली. नारळाला मागणी कमी असल्याने ४० ते ५० रुपयांनी भाव उतरले. हळदीची मागणीही कमी झाली असून हळकुंड व हळदीच्या भावात क्विंटलमागे सुमारे एक हजार रुपयांची घट झाली. इतर वस्तुंचे भाव स्थिर राहिले.घाऊक बाजारातील वस्तुंचे भाव -डाळी (क्विंटल) - तुरडाळ - ५५००-६३००हरभरा डाळ - ७१००-७५००उडीदडाळ - ७०००-७५००मुगडाळ - ६०००-६५००मसुरडाळ - ५१००-५२००साखर - ३८२५-३८५०बेसन (५० किलो) ३६५०-३९५०हळद (१० किलो) ७५०-१२५०ं