तहसील कार्यालयाखाली असलेल्या दुय्यम निबंधक कार्यालया जवळ चिमणाजी पंतसचिवांची समाधी आहे. या समाधीजवळ रद्दीचे ढीग, कपड्यांची गाठोडी, चपला असे सामान ठेवले आहे. संस्थांनचा कारभार व्यवस्थित व्हावा म्हणून अनेक इमारती पंतसचिवांनी आपापल्या कारकिर्दीत बांधल्या. पण ज्या इमारतीतून आपल्या चरितार्थ चालतो त्या इमारतीचे अधिपतींच्या समाधीची जर ही अवस्था असेल तर सामान्य जनतेच काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
गेल्या दोन महिन्यांपासून समाधीसमाेर ठेवलेल्या वस्तू प्रशासनाच्या निदर्शनात आणून देखील त्यावर पुढील कार्यवाही काहीच होत नसल्याचे शिलेदार प्रतिष्ठान व भोर तालुक दुर्ग संवर्धन सामितीचे अध्यक्ष राजेश महांगरे यांनी सांगितले. पूर्वजांनी इतिहास घडवला त्याचे नुसते गोडवे गाऊन, जयंती, पुण्यतिथी साजरी करून, घोषणाबाजी करून त्यांच्या नावाने मते मागून चालत नाही पण तो ऐतिहासिक वारसा जपण आता आपली जबाबदारी आहे याची जाणीव प्रत्येक भोरकरांना हवी.
१७ भोर