आदित्य जगताप (वय 10, स्वप्नलोक सोसायटी, पापडेवस्ती, फुरसुंगी) असे चिमुकलीला वाचविलेल्या मुलाचे नाव आहे. आदित्य आर्मी पब्लिक स्कूलमध्ये इयत्ता पाचवीमध्ये शिक्षण घेत आहे. त्याचे वडील सुधीरचंद्र जगताप आर्मीमधून सेवानिवृत्त झाले आहेत.
आदित्य म्हणाला की, मी सायकलवरून श्रीकृष्ण मंदिरामध्ये जात होतो, त्यावेळी रस्त्यावर मधोमध बसून बिस्कीट खात होती. त्याचवेळी समोरून निळ्या रंगाची कार आल्याचे पाहून हातातील सायकल फेकून दिली आणि मुलीला घेऊन रस्त्यातून बाजूला नेले. यावेळी त्याच्या हाताला आणि पायाला खरचटले आहे. मात्र, त्याकडे त्याचे लक्ष गेले नाही. मुलीला वाचविल्याचा आनंद त्याच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहत होता. चिमुकलीला चिमुकल्याने वाचविल्याने जवळ असलेल्या भाजीविक्रेत्यांसह नागरिकांनी मोठे कौतुक केले. या वेळी नागरिकांनी आदित्यला विचारले की, 'बाळा तुला हे करायचं कस सुचलं?' तर तो म्हणाला, की टीव्ही सिरीयलमध्ये कसं तो छोटा हिरो कशी लोकांना मदत करतो म्हणून मी पण केली त्यात काय एवढं! म्हणून पालकांनी आपल्या मुलांना अशा सिरीयल, असे चित्रपट दाखवले पाहिजेत, जे पाहून मुलांमध्ये शौर्य, देशप्रेमच्या भावना निर्माण होतील, अशा भावनाही नागरिकांनी व्यक्त केल्या.