येरवडा : विश्रांतवाडी येथील अवघ्या दोन वर्षाच्या चिमुरड्याच्या बौद्धिक कौशल्य व चातुर्य याबद्दल त्याची "India Book Of Records" मध्ये नुकतीच नोंद करण्यात आली आहे. आळंदीरोड येथील ड्यू ड्रॉप सोसायटी मधील रेयांश संदीप गुंजाळ याचे याबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत आहे. रेयांश संपूर्ण इंग्रजी वर्णमालेसह २९ फळे, २८ भाज्या, १२ रंग, ८ प्रकारच्या सार्वजनिक सेवा, ११ नेते, ९ विविध आकार, ५ संगीत वाद्य, १६ शारीरिक अवयव, २२ प्रकारचे पक्षी, कीटक, वाहने, ९ सागरी प्राणी, आठवड्याचे ७ दिवस, १४ घरगुती वस्तू, १ ते २० इंग्रजी अंक, २ इंग्रजी कविता, ७ भारतीय स्मारके यांची त्याला ओळख आहे. या कमी वयातील आगळया वेगळया बौद्धिक कौशल्य व चातुर्या बद्दल "इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड" कडून त्याची नुकतीच नोंद घेण्यात आली आहे. त्याच्या या कामगिरी बद्दल त्याचे व त्याच्या पालकांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
पुण्याच्या दोन वर्षीय चिमुरड्याची India Book Of Records मध्ये नोंद
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2021 5:07 PM