पारगाव येथे रयत शिक्षण संस्थेच्या 'कर्मवीर उद्यान' न्यू इंग्लिश स्कूलमध्ये १०२ चिंचेच्या झाडाचे रोपण करण्यात आले. कार्यक्रम समाजसेवक शिवाजीराव जेधे प्रतिष्ठान, विवेक विचार मंच व भरारी महिला उद्योग समूह यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला. या वेळी संयोजक दिग्विजय जेधे म्हणाले की,चिंचेच्या झाडांची लागवड करून पारगाव येथील शाळेच्या शाखेसाठी भविष्यामध्ये उत्पन्न तयार होईल व शाळा स्वावलंबी होईल. मुख्य वनसंरक्षक रंगनाथ नाईकडे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व दौंड तालुका पंचायत समिती उपसभापती सयाजीराव ताकवणे अध्यक्ष होते.
यावेळी दहावीतील गुणवंत विद्यार्थी ज्ञानेश्वरी राहुल टिळेकर (९७.४०%, क्रमांक १ला), निकिता चंद्रकांत ताकवणे (९५.८०%, क्रमांक २रा), व प्रगती नवनाथ ताकवणे (९२.०४%, क्रमांक ३रा) यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी पुणे वनविभागाचे किशोर पोळ , वन अधिकारी गायकवाड , सरपंच जयश्री ताकवणे, उपसरपंच यमुना साबळे, सर्जेराव जेधे, प्राचार्य एम.वाय.कांबळे सुभाष बोत्रे, तुकाराम ताकवणे, लक्ष्मण ताकवणे, माऊली बोत्रे, महेश शेळके, प्रतिभा जेधे, विजय चव्हाण, अशोक बोत्रे आदी मान्यवर उपस्थित होते.
पारगाव येथे 102 चिंचेची झाडे महिलांच्या हस्ते लावून लावून चिंचबन साकारण्यात आले.