शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मविआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

Sharad Pawar | "निवडणूक आयोग स्वत: निर्णय घेतंय का त्यांना कोणी मार्गदर्शन करतंय..."

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2023 2:15 PM

‘त्या’ शपथविधीमुळे राष्ट्रपती राजवटही उठली...

पिंपरी : राष्ट्रपती राजवट उठली हाच पहाटेच्या शपथविधीचा फायदा आहे. त्यामुळेच उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होऊ शकले, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले. तसेच कट्टर शिवसैनिक हा उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. विधानसभेच्या चिंचवड मतदारसंघ पोटनिवणुकीचा प्रचार शिगेला पोचला आहे. महाविकास आघाडीतर्फेही सभा, बैठका होत आहेत. त्याअनुषंगाने बुधवारी शरद पवार यांची रहाटणी येथे पत्रकार परिषद झाली. त्यावेळी ते बोलत होते.

पहाटेच्या शपथविधीबाबत शरद पवार यांना माहिती होती, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. याबाबत शरद पवार म्हणाले, महाराष्ट्रात काहीही झालं तरी एकाच व्यक्तीचं नाव घेतलं जातं. मात्र, या शपथविधीचे काही फायदेही झाले. त्यामुळेच महाविकास आघाडीचे सरकार आले. चिंचवड मतदारसंघात भाजप विरूद्ध महाविकास आघाडी अशीच निवडणूक होईल. प्रचारासाठी नेत्यांच्या गर्दीने निवडणूक जिंकता येत नाही. गर्दी जनमानसात किती प्रभावी आहे, हे महत्त्वाचे आहे. 

निवडणूक आयोगाला कोणी मार्गदर्शन करतंय का?

सत्तेचा गैरवापर करून एखाद्या पक्षाला व एखाद्या नेतृत्त्वाचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न होतो त्यावेळी लोक त्या नेतृत्त्वासोबत उभे राहतात. यापूर्वीही काही पक्षांमध्ये फूट पडली. मात्र, रागाची भावना व्यक्त करण्यासाठी एखाद्या पक्षाचे नाव व चिन्ह काढून घेण्याचा प्रकार आजपर्यंत झाला नव्हता. त्यामुळे निवडणूक आयोग स्वत: निर्णय घेतंय का त्यांना कोणी मार्गदर्शन करतंय हे महत्त्वाचं आहे, असे शरद पवार म्हणाले.  

राज्यपाल येथून गेल्याने मी संतुष्ट

महाराष्ट्राच्या राज्यपालपदी असताना भगतसिंग कोश्यारी हे सातत्याने चर्चेत राहिले. आता राज्यपाल पदावर नसतानाही ते चर्चेत आहेत. याबाबत शरद पवार म्हणाले, ते येथून गेले त्यावर मी अतिशय संतुष्ट आहे. राज्यातील प्रत्येकाच्या सुरक्षेची जबाबदारी ही सरकारची आहे.

...अन् एकनाथ खडसेंकडे दिला माइक

निवडणुका जिंकण्यासाठी भाजप कोणत्याही स्तराला जाऊ शकते, असा प्रश्न विचारला असता शरद पवार म्हणाले, याबाबत मी काय बोलणार? त्याबाबत सर्वांनाच माहिती आहे. तरीही तुम्हाला माहितीच पाहिजे असेल तर... असे म्हणून पवार यांनी एकनाथ खडसे यांच्याकडे माइक सोपविला. खडसे म्हणाले, अटल बिहारी वाजपेयी, सुषमा स्वराज अशा नेत्यांच्या वेळी भाजपमध्ये असलेली स्थिती आणि सध्याची स्थिती खूप वेगळी आहे.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारchinchwad-acचिंचवड