आ देखें ज़रा...! चिंचवड पोटनिवडणुकीसाठी स्टार प्रचारकांची यादी जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2023 04:52 PM2023-02-10T16:52:18+5:302023-02-10T16:53:30+5:30

चिंचवड व कसबा विधानसभा मतदारसंघांसाठी येत्या २६ फेब्रुवारीला मतदान होणार आहे...

Chinchwad Vidhan Sabha by-election, list of star campaigners announced | आ देखें ज़रा...! चिंचवड पोटनिवडणुकीसाठी स्टार प्रचारकांची यादी जाहीर

आ देखें ज़रा...! चिंचवड पोटनिवडणुकीसाठी स्टार प्रचारकांची यादी जाहीर

Next

पिंपरी :चिंचवड व कसबा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकांसाठी भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने स्टार प्रचारकांची फौज रिंगणात उतरणार आहे. भाजपच्या वतीने प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, नारायण राणे, आदी दिग्गज तर राष्ट्रवादीच्या वतीने अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी मंत्री छगन भुजबळ, खासदार डॉ. अमोल कोल्हे दिग्गज मंडळी प्रचार करणार आहे. चिंचवड व कसबा विधानसभा मतदारसंघांसाठी येत्या २६ फेब्रुवारीला मतदान होणार आहे.

भाजपकडून ४० जण

भाजपच्या केंद्रीय समितीने चाळीस स्टार प्रचारकांची यादी प्रसिध्द केली आहे.  भाजपचे राष्ट्रीय सचिव अरुण सिंग यांनी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांना स्टार प्रचारकांची यादी पाठवली आहे. त्यात निवडणूक प्रभारी मुरलीधर मोहोळ, विधान परिषदेचे सभापती प्रवीण दरेकर, खासदार उदयनराजे भोसले, गिरीश बापट, मंत्री सुधीर मुनगंटीवार, आमदार आशिष शेलार, महिला मोर्चा प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, ओबीसी मोर्चा प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर, आमदार विनोद तावडे, श्रीकांत भारतीय, रवींद्र चव्हाण, सुनील कर्जतकर, खासदार धनंजय महाडिक, आमदार राहुल कुल, गोपीचंद पडळकर, बाळा भेगडे, विजय देशमुख, माधुरी मिसाळ, विक्रांत पाटील, विजय चौधरी, जगदीश मुळीक, राजेश पांडे, सुधाकर भालेराव, वासुदेव काळे, इजाझ देशमुख, संदीप भंडारी, प्रकाश जावडेकर, दिलीप कांबळे, शहराध्यक्ष महेश लांडगे, हर्षवर्धन पाटील, उमा खापरे, अमर साबळे याचा समावेश आहे.

राष्ट्रवादीकडून २० जण प्रचारात
राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश समितीच्या वतीने सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांना २० स्टार प्रचारकांची यादी पाठवली आहे. केंद्र, राज्य, ग्रामीण आणि शहर पातळीवरील नेत्यांचा निवडणूक प्रचारात सहभाग करून घेण्यात आला आहे. स्टार प्रचारकांमध्ये पवार यांच्यासह माजी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, खासदार सुप्रिया सुळे, खासदार सुनील तटकरे, माजी मंत्री एकनाथ खडसे, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड, राजेश टोपे, धनंजय मुंडे, खासदार वंदना चव्हाण, फौजिया खान, माजी मंत्री शशिकांत शिंदे, आमदार सुनील शेळके, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा विद्या चव्हाण, आमदार नीलेश लंके, आमदार अमोल मिटकरी, सुभान अली शेख यांचा समावेश आहे.

Web Title: Chinchwad Vidhan Sabha by-election, list of star campaigners announced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.