शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

चिंकारा शिकार प्रकरण ४ वर्षांपासून प्रलंबित, धर्मराव आत्राम आरोपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 07, 2018 4:47 AM

बारामती तालुक्यातील दोन चिंकारांची हत्या करून त्यांचे मांस खाल्ल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे माजी राज्यमंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या विरोधात सुरू असलेला खटला प्रलंबित आहे.

पुणे - बारामती तालुक्यातील दोन चिंकारांची हत्या करून त्यांचे मांस खाल्ल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे माजी राज्यमंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या विरोधात सुरू असलेला खटला प्रलंबित आहे. जबाबाच्या मुद्द्यावर निकाल न झाल्याने गेल्या चार वर्षांपासून हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात प्रलंबित आहे. त्यामुळे सासवड न्यायालयात सुरू असलेल्या खटल्याची प्रक्रिया थांबलेली आहे.काळवीट शिकारप्रकरणी अभिनेता सलमान खानला गुरुवारी जोधपूर न्यायालयाने पाच वर्षे तुरुंगवास आणि १० हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे. तर सैफ अली खान, तब्बू, सोनाली बेंद्रे, नीलम या कलाकारांना निर्दोष मुक्त केले आहे. त्यामुळे बारामती येथे झालेले चिंकारा शिकार प्रकरण पुन्हा चर्चेत आले आहे. आरोपींचे जबाब पुरावे म्हणून ग्राह्य धरता येतील की नाही, यावर मुंबई उच्च न्यायालयात सुरू असलेल्या वादामुळे सुनावणी थांबलेली आहे.१४ जून २००८ च्या मध्यरात्री सोमेश्वरनगरमध्ये तीन आलिशान गाड्यांतून आलेल्यांनी हरणाची शिकार केल्याची तक्रार चौधरीवाडी येथील ग्रामस्थांनी दिली होती.तपासानंतर लाल दिव्याची ती गाडी राज्यमंत्री धर्मराव बाबा अत्राम यांची असल्याचे निष्पन्न झाले होते. त्यामुळे अत्राम यांच्यासह इतर आरोपींवर वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ आणि वन कायदा १९२६ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सुरेश बिरमाणे, रवींद्र वाडकर, महेश बिरमाणे, रवी सोराप, अंकुश सानस, प्रभाकर वाघ, सय्यद अली हुसेन अशी इतर आरोपींची नावे आहेत.याबाबत जिल्हा सरकारी वकील उज्ज्वला पवार यांनी सांगितले की, सासवडचे तत्कालीन विभागीय वन अधिकारी एस. जी. धुमाळ या प्रकरणात तपास अधिकारी होते. त्यांनी आत्राम यांच्यासह सर्व आरोपींचे जबाब नोंदवले होते. या प्रकरणात दिलेल्या पुराव्यांवर बचाव पक्षाने आक्षेप घेतला होता. या संदर्भात स्पष्टीकरणासाठी २०१४ मध्ये हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात गेले होते. तेव्हापासून उच्च न्यायालयाने कोणतेही आदेश दिलेले नाहीत. जोपर्यंत उच्च न्यायालयाचा निकाल येत नाही तोपर्यंत पुढील जबाब घेता येणार नाहीत.

टॅग्स :Courtन्यायालयPuneपुणेMaharashtraमहाराष्ट्र